शिरूरचे पोलिस निरीक्षक केंजळे व उपनिरीक्षक चव्हाण यांच्या विरोधात अल्पवयीन आरोपीच्या आईकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल...
शिरूर: मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातील भीमा नदीपात्रात 1 ऑक्टोबर 2024 रोजी एक अज्ञात मृतदेह आढळला होता. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू असल्याची नोंद पोलिसांनी केली. मात्र तपासादरम्यान गुऱ्हाळ मालक नवनाथ तुकाराम कोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन कामगारांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा असून कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला आरोपी ठरवले. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व गुऱ्हाळ मालक नवनाथ कोंडे यांना सहआरोपी करण्यासाठी रीट याचिका दाखल केली आहे.
आरोपी अल्पवयीन मुलाचे वय विचारात न घेता पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवले तसेच त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला तब्बल आठ महिने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. अखेरीस त्याच्या आईने सादर केलेल्या पुराव्यांनंतर तो अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले व बाल न्यायालयाने त्याला तातडीने जामीन मंजूर केला.दरम्यान या प्रकरणातील अनेक गंभीर बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने फिर्यादीला आरोपी न करता वाचवले गेले, संबंधित प्रकरणातील मृताची खरी ओळख आजतागायत पटविण्यात आलेली नाही, तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व इतर पुरावे नष्ट करून खोटे पंचनामे व खोटे पुरावे तयार करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मृताच्या कपड्यांवर कृत्रिमरित्या रक्त व केस दाखवून पुरावा बनवण्यात आला, दुसऱ्या आरोपीच्या वडिलांची खोटी सही करून मोटारसायकल जप्तीचा पंचनामा तयार करण्यात आला असल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलाच्या आईने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व गुऱ्हाळ मालक नवनाथ तुकाराम कोंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली असून, निष्पक्ष तपासासाठी सीबीआय चौकशीची मागणी अल्पवयीन मुलाच्या आईने याचिकेमध्ये केली आहे. न्यायालयीन लढ्यातून निर्दोष मुलाला न्याय मिळवून देण्याचा आईचा निर्धार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.संबंधित प्रकरणी सर्व कारवाई उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कारदेशीररित्या करण्यात आली आहे.– संदेश केंजळे (पोलीस निरीक्षक, शिरूर)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.