Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत महायुतीला धक्का? दोन पराभवानंतर संजयकाका पाटील लवकरच पुढचा डाव टाकणार

सांगलीत महायुतीला धक्का? दोन पराभवानंतर संजयकाका पाटील लवकरच पुढचा डाव टाकणार
 

लोकसभा निवडणूक पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत ही पराभव झाल्यानंतर सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील हे राजकारणाच्या पटलावर काही काळ दिसलेच नव्हते. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी पाटील हे सीमोल्लंघन करणार आहेत. 27 सप्टेंबर रोजी तासगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील दिशा स्पष्ट स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपमधून त्यांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादीतून विधानसभेला पराभव पत्करावा लागला. भाजपमध्ये परतीचा मार्ग असताना उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेले संजय पाटील कोणता निर्णय घेण्यात याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपमधून (BJP) संजय काका पाटील यांनी अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून तासगाव मधून आमदार रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामध्ये देखील त्यांचा पराभव झाला. मध्यंतरीच्या काळात भाजपमध्ये घरवापसीच्या चर्चा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जोरात सुरू होत्या. भाजपमध्ये परतीच्या चर्चा सुरू असतानाच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षप्रवेशाला छेद देणारे वक्तव्य केले.

180 इच्छुकांची वाढली धडधड
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे संजय पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाची चर्चा तिथे थांबली. विधानसभा निवडणुकीचा जवळपास आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लोटला. मात्र संजय काका पाटील हे सांगलीच्या राजकीय पटलावर दिसले नाहीत. अशातच तोंडावर सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आहे. त्यामुळे संजय काका पाटील यांची भूमिका नेमकी काय आहे असा प्रश्न कार्यकर्त्यांना आहे. ही भूमिका जाहीर करावी, अशी भावना कार्यकर्त्यांची राहिल्याने शनिवारी संजय काका पाटील यांनी तासगाव मध्ये मेळावा आयोजित केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच नेते सांगलीत उतरले. सर्वपक्षीय नेत्यांच्या या आंदोलनात काही महायुतीचे नेते देखील सहभागी झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची आघाडी यामध्ये चर्चेची होत आहे. त्यामुळे संजय काकांच्या भूमिकेला अधिक महत्त्व आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संजय काका पाटील यांनी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून विकास आघाडीचा निर्णय घेतल्यास तासगाव कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा धक्कादायक समीकरण जुळण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.