Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

81 वर्षीय अभिनेत्यासमोर अक्षय-अर्शद फेल, 12 दिवसांत निर्माण केलं वादळ.

81 वर्षीय अभिनेत्यासमोर अक्षय-अर्शद फेल, 12 दिवसांत निर्माण केलं वादळ.
 

बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा हीट ठरतो आणि कोणता सिनेमा फ्लॉप ठरतो… हे फक्त आणि फक्त प्रेक्षकच ठरवतात… सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025 मध्ये मोठ्या बजेटच्या सिनेमांनी नाही तर, लहान बजेटच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवला आहे. 400 कोटींमध्ये तयार झालेल्या ‘वॉर 2’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. तर दुसरीकडे 'लोका', 'मिराय' आणि गुजराती ‘वश 2’ सिनेमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. सिनेमाचं नाव आहे ‘दशावतार’. सिनेमा सलग तीन आठवडे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘एलएलबी 2’ सिनेमा प्रेक्षकांना काही आवडलेला दिसत नाही…

ज्या मराठी सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे, ते कौतुक फक्त आणि फक्त दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यामुळे शक्य झालं आहे. 81 वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी बॉॉक्स ऑफिस गाजवला आहे. सिनेमात त्यांनी साकारलेली भुमिका सर्वांनाच आवडली. महाराष्ट्रात ‘दशावतार’ सिनेमाने अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. जाणून घ्या सिनेमाने 12 व्या किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

सॅकनिल्कचा रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार ‘दशावतार’ सिनेमा अजूनही लाखोंची कमाई करत आहे. 12 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 6 लाखांनी सुरुवात केली. एका आठवड्यात सिनेमाचा व्यवसाय लाखो रुपयांपर्यंत पोहोचला. एका आठवड्यात सिनेमाने 9.2 कोटींपर्यंत मजल मारली. आतापर्यंत, सिनेमाने भारतात एकूण 17.50 कोटी रुपये कमावले आहेत. तर 12 दिवशी सिनेमाने 85 लाख कमावले. 
 
‘दशावतार’ सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. ‘दशावतार’ सिनेमा ‘जारण’ सिनेमाला देखील मागे टाकलं आहे. जो दुसरा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. ‘दशावतार’ सिनेमाच्या बजेटबद्दल सांगायचं झालं तर, फक्त 5 कोटी रुपयांमध्ये सिनेमा तयार झाला आहे. या आठवड्यात देखील सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली तर सिनेमा 20 कोटी रुपयांपर्यत नक्की जाईल.

कोण आहेत दिलीप प्रभावळकर

दिलीप प्रभावळकर हे मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाव आहे. ते दिग्दर्शक आणि लेखक देखील आहेत. 2006 मध्ये प्रदर्शीत झालेल्या लगे रहो मुन्ना भाई’ सिनेमात त्यांनी महात्मा गांधी यांती भुमिका साकारली होती. सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांनी केवळ मराठी सिनेमांमध्येच नव्हे तर बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या “दशावतार” या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना कौतुकाचा वर्षाव होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.