Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! मृतदेह ३ दिवस जिन्यात पडून, ट्रॉमा केअर रुग्णालयात कुणालाच समजलं नाही; BMC प्रशासन झोपेत, दुर्गंधीमुळे उघडकीस

धक्कादायक! मृतदेह ३ दिवस जिन्यात पडून, ट्रॉमा केअर रुग्णालयात कुणालाच समजलं नाही; BMC प्रशासन झोपेत, दुर्गंधीमुळे उघडकीस
 

जोगेश्वरी पूर्व इथं असलेल्या ट्रॉमा केअर रुग्णालयाचा गंभीर बेजबाबदारपणा समोर आला आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर फायर एक्झिट जिन्याच्या परिसरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता हा अपघाती मृत्यू असल्याचं समोर आलंय. मात्र तब्बल तीन दिवस मृतदेह एका ठिकाणी पडून राहिला तरी कुणाच्याच कसं लक्षात आलं नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुर्तुझ शेख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मुर्तुझ शेख १६ सप्टेंबरला नोकरीसाठी झारखंडहून मुंबईत आले. ते गोरेगावमध्ये त्यांच्या मित्रांसोबत काम करत होते. मात्र १८ सप्टेंबरला तब्येत बिघडल्यानं उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात आले होते. रुग्णालयात कोणता विभाग कुठे आहे याची त्यांना माहिती नव्हती. यामुळे ते रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फायर एक्झिट जिन्याकडे गेले असावेत.

फायर एक्झिटच्या जिन्यात मुर्तुझ चक्कर येऊन पाय घसरून पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. त्यांच्या डोक्याला जिन्याचा कोपरा जोरात लागून गंभीर दुखापत झाल्याचं शवविच्छेदन अहवालात आढळून आलंय. मात्र एका रुग्णालयात जिन्यावर तीन दिवस मृतदेह पडून राहिला आणि याची माहिती कुणालाच न समजल्यानं आता रुग्णालय प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 
 
ट्रॉमा केअर रुग्णालयातील फायर एक्झिट जिन्याचा भाग वापरात नाही. शेख नेमके त्याच भागात पडले होते. यामुळे कुणालाच याची कल्पना नव्हती. तब्बल तीन दिवस मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता. काहीतरी कुजल्यासारखा उग्र वास रुग्णालयात आलेल्यांना आला. त्यानंतर पाहणी केली असता जिन्यात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.