मिळनाडूच्या करूर येथे शनिवारी रात्री अभिनेता ते नेते बनलेले विजय यांची रॅली उत्साहातून शोकात रुपांतरीत झाली. आपल्या आवडत्या सुपरस्टारला जवळून पाहण्याच्या उत्साहात लोकांमध्ये अशी चढाओढ झाली की गर्दी अनियंत्रित झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 39 जणांचा बळी गेला. या मृतांमध्ये 17 महिला, 13 पुरुष, 4 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. या अपघातात 60 हून अधिक लोक जखमी झाले असून अनेक रुग्णालयात जीवनासाठी झुंज देत आहेत. आता चेंगराचेंगरीचे खरे कारण समोर आले आहे.
नेमकं कारण काय?
अभिनेता विजय यांच्या या महारॅलीत गर्दी इतकी प्रचंड होती की काही लोक विजय यांची एक झलक पाहण्यासाठी झाडाच्या फांद्यांवर चढले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्यापैकी काही लोक झाडाच्या फांदीवरून खाली पडले आणि विजय यांच्या प्रचार व्हॅनच्या मागे उभ्या असलेल्या लोकांवर कोसळले. तिथूनच अचानक गोंधळ सुरु झाला. गर्दीत काहीतरी मोठा अपघात झाल्याची भीती पसरली आणि लोक इकडे-तिकडे पळू लागले. काही क्षणातच तिथे चेंगराचेंगरी झाली. स्वत:चा जीव मूठीत घेऊन पळताना काही लोक जमिनीवर पडले.
'तासन्तास ऊनात विजय यांची वाट पाहत होते लोक'
तमिळनाडूचे डीजीपी जी. वेंकटरामन यांनी मध्यरात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, रॅलीसाठी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी होती, पण विजय यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर दुपारी 12 वाजता येण्याची घोषणा झाली होती. यामुळे लोक सकाळी 11 वाजल्यापासूनच रॅली स्थळावर जमू लागले होते. मात्र, विजय सायंकाळी 7:40 वाजता पोहोचले. डीजीपी म्हणाले, 'लोक तासन्तास ऊनात अन्न-पाण्याशिवाय वाट पाहत होते. यामुळे गर्दी अस्वस्थ झाली. आमचा कोणाला दोष देण्याचा हेतू नाही, पण बराचवेळ प्रतीक्षा आणि गर्दीच्या संख्येमुळे परिस्थिती बिघडली.' पोलिसांच्या मते, आयोजकांनी 10,000 लोकांची परवानगी घेतली होती, पण सुमारे 27,000 लोक जमले. वाढत्या गर्दीसमोर परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही.
उत्साह शोकात बदलला?
सुपरस्टार विजय यांची झलक पाहण्याचे स्वप्न पाहणारे हजारो लोक कधीच विचार करू शकले नसते की ही रॅली इतक्या वेदनादायक शोकांतिकेत बदलेल. झाडाच्या फांदीवरून पडलेली एक व्यक्ती त्या मृत्यूच्या लाटेची सुरुवात ठरली, ज्याने 39 निरपराध जीव घेतले. पोलिसांनी या प्रकरणी विजय यांच्या तमिळगा वेट्ट्री कझगम (TVK) विरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी TVK च्या दोन वरिष्ठ नेत्यांवर, एन. आनंद आणि सीटी निरमल कुमार यांच्यावर गैरहत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कुमार हे TVK च्या करूर जिल्हा युनिटचे सचिव आहेत. या रॅलीच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याच हातात होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.