जळगाव हादरले! माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाउसवर आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचा अड्डा उघड; ८ संशयित ताब्यात
जळगाव: ममुराबाद रोडवरील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल. के. फार्म हाउसवर आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचा अड्डा चालविला जात असल्याचे उघडकीस आले आहे. सायबर पोलिस, गुन्हे शाखा व खास पोलिस पथकाने कॉल सेंटरवर छापा टाकला. सहा तास चाललेल्या पोलिसांच्या कारवाईत फार्म हाउसचे मालक, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ संशयितांना ताब्यात घेतले. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बेकादेशीर ऑनलाइन कॉल सेंटर किंवा सट्टा बेटिंग चालवली जात असल्याच्या माहितीवरून अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक नितीन गणापुरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, कावेरी कमलाकर, संजय गायकवाड, उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, दिलीप चिंचोले यांनी दुपारी एकला एल. के. फार्म हाउससवर छापा टाकला. तेथे सायबर तज्ज्ञांना दोन लॅपटॉप आढळले. त्या लॅपटॉपद्वारे परदेशी नागरिकांना संपर्क करून गंडविल्याचे प्रथमदर्शनी आढळले.बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने परदेशी व भारतातील नागरिकांना संपर्क करून त्यांची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचे आढळले. सायबर गुन्हेगारांकडे असलेल्या सॉफ्टवेअरद्वारे ऑनलाइन सर्व डाटा 'डीलीट' होण्याची भीती असल्याने सायबर पोलिस ठाण्यातील तज्ज्ञ अधिकारी व फॉरेन्सिक पथकाने तातडीने घटनास्थळावरून ३१ लॅपटॉप, मोडेम जप्त केले.कोलकाता येथील चौघांसह मुंबईतील काही तरुणांसह एक विविध परदेशी भाषा बोलता येणारी तरुणी असे २५-३० लोक कॉल सेंटरवर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यापैकी सात जणांना ताब्यात घेतल्यावर चौकशीत इतर काम करणारे वीकेंड (शनिवार- रविवार) जोडून सुटी आल्याने आपल्या गावी निघून गेले होते.
जळगाव पोलिसांचे होत आहे कौतुक
जळगाव
शहरात ऑनलाइन फसवणुकीचा अड्डा चालविला जात असल्याची माहिती मिळाल्याबरोबर
पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षकांनी कारवाईसाठी पावले उचलली. पोलिसांनी कर्तव्य
दक्षता दाखवत कोणताही मुलााहिजा न ठेवता केलेल्या कठोर कारवाईने पोलिसांचे
कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.