मुंबई: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यातील सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांसंबंधी काही मागण्या तात्काळ मान्य करत जीआर सुपूर्द केला. जरांगे पाटील यांनी तुमच्यामुळे जिंकलो असे जाहीर केले. त्यानंतर आझाद मैदान परिसरात जल्लोष साजरा केला. पण तेथे असलेल्या वकील योगेश केदार यांनी जीआरवर आक्षेप घेत सरकारनं फसवलं आहे अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करत जीआरसंबंधी भूमिका मांडली.
दादांची वकिलांनी दिशाभूल केली
मनोज दादांसारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जीआर तपासून घेण्याची जबाबदारी दिली होती. याच्यात काही उणिवा असतील तर सांगा. तिथेच आम्ही तपासला जीआरमधील शब्दांत बऱ्यापैकी फेरफार केला गेलेला आहे. त्यात संभ्रम ठेवला गेला आहे. जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोजदादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांची दिशाभूल केली आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की, सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे.
शिंदे समितीनं ते आधीच शोधलंय
मनोजदादांनी आजही संयम बाळगावा, आम्ही त्यांच्या नेतृत्त्वात लढण्यास आजही तयार आहोत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. पण या जीआर वाचला तर आपल्याला त्यातील अनेक उणिवा लक्षात येतील. या जीआरचा कोणाला लाभ होऊ शकतो. ज्यांच्या नोंदी कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल. मग यात वेगळं काय आहे. शिंदे समितीने ते आधीच शोधलं आहे. अजून सोप्या भाषेत सांगतो. ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत. त्यांनाच याचा फायदा होणार आहे.
सत्य सांगत असताना मला दूर केलं
ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडली नाही. त्यांना याचा काही लाभ होणार नाही. आम्ही असे समजत होतो की, हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजे तेथील सर्व मराठा कुणबी आहेत. किंवा मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा आहेत. असे त्यात कुठेही स्पष्टता नाही. हैदराबाद गॅझेटियरच्याबाबतीत अनेक कायदे तज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. या जीआरला सुद्धा आव्हान देता येईल. यातून मराठांच्या पदरात काही मिळालेलं नाही. दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्याजवळच्या लोकांनी मला दूर केलं. नंतर दादांनीही मला थोडसं दूर केलं. पण त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल म्हणून एक छत्रपतींचा मावळा म्हणून सत्य सांगण्याचं धाडस मी दादांना तिथे केले. भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही. पण त्यांना लक्षात आलेलं आहे की योगेश केदार म्हणतोय म्हणजे त्यात काहीतरी खरं आहे. आता मनोजदादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती. म्हणून समाजाला समजून घ्यावं लागणार आहे.
संधी सरकारनं हिरावून घेतली
परत एकदा लढ्याची तयारी ठेवावी लागणार आहे. मनोजदादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही. त्या नेतृत्त्वासारखा प्रामाणिक नेता नाही असे माझे मत आहे. फक्त काही लोक मिसगाईड करतात. शेकडो लोकांच्या त्यागातून आणि करोडो रुपये खर्च करुन मुंबईत ठाण मांडला होता. सरकार घाबरलं होते. अशा स्थितीत जिथे जिथे मराठा शब्द आहे. तिथे तिथे दाखला देण्याची संधी होती. ती सरकारने हिरावून घेतली. आज मला मराठा समाजाने मला माफ करावं. माझा आवाज कमी पडला. आपण सरकारला सत्य सांगू.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.