कोल्हापुरात 'एमआयएम' पक्ष कार्यालयाचा वाद पेटला; ओवैसी अन् इम्तियाज जलील यांना हॉटेलबाहेर पडणंही झालं मुश्किल
कोल्हापूर जिल्ह्यात मागील तीन वेळा एमआयएमचे खासदार आणि नेते अससूद्दीन ओवेसी यांना कोल्हापुरात विरोध झाला होता. मात्र सोमवारी (ता.29) पक्षाच्या सभेसाठी आणि कोल्हापुरात पक्षकार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांना पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कोल्हापुरात या पक्षाचे कार्यालय नको हीच भूमिका हिंदुत्वादी कार्यकर्ते आणि कोल्हापूरकरांनी घेत त्यांना हॉटेलबाहेरही देखील पडू दिले नाही.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलिसांकडूनच खबरदारी घेत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बागल चौक येथे जाण्यासाठी मनाई करण्यात आली. अखेर दुपारी एक वाजता आलेल्या खासदार ओवैसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना सायंकाळपर्यंत हॉटेलमध्येच बसावे लागले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी खासदार अससुद्दीन ओवीसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील आले आहेत. कोल्हापुरातील बागल चौक येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार होते. मात्र, कोल्हापूर वासीय आणि हिंदुत्ववादी कार्यालयाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला.सकाळपासूनच बागल चौक येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली होती. यावेळी प्रचंड घोषणाबाजी दोन्ही गटांकडून सुरू होते. मात्र योग्य खबरदारी घेत कोल्हापूर पोलिसांनी देखील तितकाच तगडा बंदोबस्त बागल चौक येथे लावला होता. बागल चौक येथील वातावरण तणावपूर्ण बनत असल्याने खासदार ओवीसी आणि इम्तियाज जलील यांना या ठिकाणी येण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे एक वाजल्यापासून दोघेही हॉटेलमध्येच थांबून होते. हॉटेल बाहेर देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.तसेच ओबीसी याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू होती. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ओवैसी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, ती देखील काही कारणास्तव रद्द करण्यात आली. त्याऐवजी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खासदार ओवैसी आणि इम्तियाज जलील कोल्हापुरात दाखल झाले होते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता इचलकरंजीमध्ये त्यांची सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर साडेसहा वाजता दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.