Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आठ दिवस कुठं होता? नुसते फोटो काढायला आलात का?; माढ्यातील शेतकऱ्यांचा रोष पाहून हात जोडत सदाभाऊंचा काढता पाय

आठ दिवस कुठं होता? नुसते फोटो काढायला आलात का?; माढ्यातील शेतकऱ्यांचा रोष पाहून हात जोडत सदाभाऊंचा काढता पाय

अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसह शेती वाहून गेली असून घरात पुरामुळे सर्वत्र चिखल झाला आहे, त्यामुळे बळीराजा अक्षरशः रस्त्यावर आला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 'आठ दिवस कुठं होता?, आम्ही वर्गणी काढून सदाभाऊंना 2014 च्या निवडणुकीत लीड दिला ते आमच्याकडं 11 वर्षांनी आलेत,' असे म्हणून शेतकऱ्यांनी खोतांना घेरले. शेतकऱ्यांचा संताप पाहून अखेर सदाभाऊंनी खोतांनी हात जोडून काढता पाय घेतला.

आमदार सदाभाऊ खोत हे आज माढा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. उंदरगाव हे माढा लोकसभा मतदारसंघातील गाव असून या गावाने लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत वर्गणी काढून सदाभाऊ खोत यांना मदत केली होती. तसेच गावातून मताधिक्क्यही दिले होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनंतर सदाभाऊ खोत हे उंदरगावात आले होते, त्यामुळे खोतांवर ग्रामस्थांचा राग होता.

माढा तालुक्यातील उंदरगावात आलेल्या सदाभाऊ खोत यांना आठ दिवस कुठं होता. नुसते फोटो काढायला आलात का, असा प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर करण्यात आला. रस्त्यावरून पाहणी करणाऱ्या सदाभाऊंना शेतकरी आमच्या घराकडे चला असं म्हणत होते. तुम्ही नुसतंच रस्त्यावर उभे राहून पाहणी करून काय उपयोग? असेही शेतकरी म्हणत होते. मात्र, ग्रामस्थांचा रोष पाहून सदाभाऊ खोत यांनी अक्षरशः हात जोडले आणि काढता पाय घेतला.

एका ज्येष्ठ शेतकऱ्याने 'सदाभाऊ आमच्यावर उपकार करा' अशी हात जोडून विनंती केली. आम्ही निवडणुकीत दिलेले पैसे तरी आम्हाला माघारी द्या, असे शेतकरी आक्रमकपणे बोलत होते. हे सर्व सदाभाऊ खोत हताशपणे पाहत होते. अनेक शेतकरी जनावरांच्या वैरणीची सोय करावी, अशी विनंती करत होते. हात जोडलेले ज्येष्ठ शेतकरी म्हणाले, आमच्यासाठी मदत न आणणाऱ्या सदाभाऊंनी माघारी जावं. आमचं नशिबानं काही होईल ते होईल.

प्रहार संघटनेने आमच्यासाठी काहीच केलेले नाही. आमच्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. सदाभाऊ खोत यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी ह्या पठ्ठ्याने पाच हजार रुपये दिले होते. आमची काहीच मागणी नाही, त्यांनी माघारी जावं. आम्हाला त्यांचं काहीच नको आहे. ते सोळा वर्षांनी आले आहेत.आमच्या नशिबाने काय होईल ते तुम्ही आमच्याकडे येऊही नका आणि काही देऊ नका, असे सुनावले.

आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही वादविवाद करून काय उपयोग होणार आहे. तुम्ही म्हणाला माघारी जावा,जर जातो माघारी असे सदाभाऊ खोत म्हणाले. त्यावर शेतकरी म्हणाले, तुम्ही लोकसभा निवडणुकीला उभे होता, त्या वेळी 25 हजारांची वर्गणी देऊन पाचशे पाचशेच्या माळा घातल्या. या गावानं तुमच्यावर प्रेम दिलं, तुम्हाला लीड दिलं. त्यानंतर तुम्ही आमच्याकडं आताच आला आहात, असेही शेतकऱ्यांनी सुनावलं.

आमची जनावरं रस्त्यावर बांधली आहेत. आम्ही कसं तरी माणसं वाचवली. आमच्या घरातील लोकांना पाहुण्या-रावळ्यांकडे पाठवलं. आम्ही गेली तीन दिवसांपासून कलेक्टरपासून बीडीओपर्यंत सर्वांशी बोलतोय. पण, जनावरांना चारा मिळत नाही. खासदारांनी थोडाफार चारा दिला आहे. गावांत फवारणी नाही, सगळेजण टोलवाटोलवी करत आहेत, असेही शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना ऐकवले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.