'मौलाना भूल गया कि यूपी में किसकी सरकार है' ; योगींचा उपद्रवींना कडक इशारा!
बरेलीमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपद्रवींना कडक इशारा दिला आहे. आज (शनिवार) लखनऊमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री योगी म्हणाले की, कधीकधी लोकांच्या वाईट सवयी कायम राहतात, म्हणून त्यांचे जरा डेंटींग-पेंटींग करावे लागते आणि काल तुम्ही बरेलीमध्ये हेच पाहिले.
तसेच, ''मुख्यमंत्री योगी म्हणाले की २०१७ पासून आम्ही कर्फ्यू लागू होऊ दिलेला नाही. मात्र अशा लोकांना त्यांच्याच भाषेत समजून शिक्षा केली पाहिजे. तुम्ही पाहिले असेलच की सण आणि उत्सवांच्या वेळीच हिंसाचार उफाळून येतो. मात्र आता, अशा वृत्तीच्या लोकांना आणि उपद्रवींना हे चांगलचं लक्षात राहील. त्यांच्या सात पिढ्याही कधी विसरणार नाहीत.'' असंही योगींनी म्हटलं.
मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले, "तो मौलाना सत्तेत कोण आहे हे विसरला. त्याला वाटले होते की आम्ही धमकावू आणि नाकाबंदी करू. पण आम्ही म्हटले होते की नाकाबंदी किंवा कर्फ्यू होणार नाही, परंतु आम्ही तुम्हाला कर्फ्यूबद्दल असा धडा शिकवू की तुमच्या भावी पिढ्या दंगा करायला विसरतील. ही कोणत्या प्रकारची पद्धत आहे? तुम्ही व्यवस्था रोखू इच्छित आहात का?"
याशिवाय मुख्यमंत्री योगी म्हणाले, " अशा लोकांना त्यांच्याच भाषेत गोष्टी समजावून सांगून शिक्षा करण्याचे काम आम्ही केले आहे. जातीच्या नावाखाली भडकावणाऱ्या आणि कुटुंबाच्या नावाखाली भावनांचा वापर करणाऱ्यांसाठी आम्ही बुलडोझर बनवले आहेत. हे असे लोक आहेत जे खोट्या घोषणा देऊन समाजाची दिशाभूल करणाऱ्या परजीवींसारखे आहेत."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.