मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीसह आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.
सुप्रिया सुळे यांनी कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे पत्र सादर केले. अतिवृष्टीमुळे शेतीची प्रचंड हानी झाली असून राज्य शासन, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांकडून केली जाणारी मदत पुरेशी नाही. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली.
सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट :
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या भेटीनंतर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील पूरस्थितीची भीषण स्थिती सांगितली. राज्यातील शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली असून शेती नापिक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे पीके जाग्यावर कुजली असल्याचे त्यांना सांगितले.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी केंद्रातून आर्थिक पॅकेज मिळावे तसेच त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी आग्रही मागणी केली. शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी शून्य अथवा कमी व्याजदराने कर्ज मिळावे, तसेच शेतकऱ्यांच्या चालू कर्जांसाठी कोणताही तगादा लावू नये अशी मागणी केली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेऊन त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, असेही सुळे यांनी सांगितले.
देवाभाऊं ऐकत नाही :
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस हे वेळ देत नाही, असा सुप्रिया सुळे यांचा मागील काही
दिवसांपासून आरोप आहे. राज्याचे मुख्यमंत्री वेळच देत नाहीत. तब्बल दहा
वेळा वेळ मागूनही त्यांना भेट नाकारण्यात आली. याचा अर्थ काय? तर त्यांना
वेळ द्यायचा नाही. पण मुख्यमंत्री वेळ देत नसले तरी आपली कामे दिल्लीतून
होतात, असेही सुळे यांनी सांगितले होते. त्यानुसारच आताही त्यांनी आपल्या
मागणीकडे फडणवीस सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत पुन्हा एकदा
केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.