सांगली कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली च्या वार्षिक सभेने मंजुरी दिल्यानंतर संस्थेचे अधिकृत भागभांडवल वाढीचा पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला नुकतेच मंजुरी मिळाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे व व्हाईस चेअरमन अॅड. एस.पी. मगदूम यांनी दिली.
यापुर्वी संस्थेचे अधिकृत भागभंडवल रु. ५० कोटी होते. संस्थेचे भाग घेण्यासाठी सभसदांनी उत्स्फुर्तता दाखविल्यामुळे अगदी अल्पावधीत संस्थेने ही मर्यादा पुर्ण केल्यामुळे रु. १०० कोटी अधिकृत भागभांडवलाचा पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सन २०२४ अखेर वसुल भाग भांडवल रु.३४ कोटी ८५ लाख होते, सन २०२५ मध्ये त्यामध्ये रु. रु.८ कोटी २१ लाखाने वाढ होवून ते आर्थिक वर्ष अखेर रु.४३ कोटी ०६ लाख झाले. तर मागील ५ महिन्यात ते रु.७ कोटीने वाढ होवून संस्थेने रु. ५० कोटी मंजुर मर्यादा पुर्ण केली आहे.सभासदांची वैयक्तिक भागधारण मर्यादा रु.४ लाख करण्यात आली आहे. त्यास देखील सभासदांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. संस्थेने सातत्याने १५ टक्के लाभांश दिल्यामुळे तसेच भरणा तारखेपासून दिवस पध्दतीने लाभांश मिळत असल्यामुळे सभासद समाधानी आहेत. संस्थेची सभासद संख्या ६८००० आहे. संस्थेच्या विनम्र सेवेमुळे सभासद समाधानी आहेत. सभासद व भागभांडवल वाढीचे प्रमाण अत्यंत समाधानकारक आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या ९.५० टक्के व्याजाच्या मंगलमुर्ती ठेव योजनेस देखील ठेवीदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याबाबत माहिती देतेवेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.