Big Breaking ! मनोज जरांगेंना झटका, मराठा आंदोलकांना दीड तासात आझाद मैदान सोडावं लागणार? मुंबई हायकोर्ट काय म्हणालं?
गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या देऊन बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे. कारण आता मुंबई पोलिसांपाठोपाठ उच्च
न्यायालयाकडूनही त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे.
तुमच्याकडे आंदोलनाची परवानगी नसेल तर तात्काळ जागा खाली करा. अन्यथा तीन
वाजता उच्च न्यायालय यासंदर्भात आदेश काढेल, असे हायकोर्टाच्या खंडपीठाकडून
सांगण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मंगळवारी पुन्हा एकदा उच्च
न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि
न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी
उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना दिलासा देण्यास
नकार दिला. परिणामी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांना पुढील
दीड तासामध्ये आझाद मैदान सोडावे लागण्याची वेळ येऊ शकते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी यावेळी राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे ओढले. काल मी विमानतळावरून परतता होतो एकही पोलिसांची गाडी रस्त्यावर नव्हती. तुमच्या पोलीस व्हॅन कुठे होत्या आम्हाला माहिती द्या. उच्च न्यायालयाला घेराव घातला जातो. ही कृती योग्य नाही. न्यायाधीशांना पायी चालत यायची पाळी आली. त्यामुळे आम्ही राज्य सरकारशी देखील संतुष्ट नाही, असे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले. आजच्या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मनोज जरांगे यांची बाजू मांडली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने मराठा आंदोलकांच्या कृतीबद्दल माफी मागितली. मराठा आंदोलकांची मुंबईत व्यवस्था न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली, असे त्यांनी म्हटले.मात्र, यानंतरही न्यायालयाने मराठा आंदोलकांना दिलासा देण्यास नकार दिला. स्थानिकांना शांततेत राहू द्या. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, ते घराबाहेर पडू शकत नाहीत. तीन वाजेपर्यंत आम्हाला सगळं सुरळीत हवंय. अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ, असे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. आता तीन वाजता उर्वरित सुनावणी होणार आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण आंदोलनाबाबत अंतिम निकाल देण्यात येईल. तीन वाजेपर्यंत माहिती द्या, नाही तरी आम्ही कारवाई करणार कायद्यात जे काही आहे त्यानुसार आम्ही कारवाई करणार, कोर्टाच्या अवमान केला तर कारवाई होईल, असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.