लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे पाच दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या नोटीसनंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडे मराठा आंदोलकांच्या नजार खिळल्या आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. त्यामुळे आता पोलिसांच्या नोटीसनंतर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस पाठवण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजवली आहे. पोलिसांच्या या नोटीसनंतर आता मराठा आंदोलक काय भूमिका घेतात? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यात आता पोलिसांची नोटीस आली आहे.आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिस यांनी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. त्यामध्ये लवकरात लवकर आझाद मैदान खाली करण्याबाबत पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात जरांगे पाटलांनी प्रसार माध्यमांवर केलेल्या वक्तवयाचीही पोलिसांनी दखल घेत त्याचा उल्लेखही नोटीसमध्ये केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.