Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१०० रुपयांचे नाणे जारी, पण गांधी नव्हे तर...; नव्या चलनावर फोटो कुणाचा?

१०० रुपयांचे नाणे जारी, पण गांधी नव्हे तर...; नव्या चलनावर फोटो कुणाचा?
 

नवी दिल्ली : भारत सरकारने नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) १०० व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आरएसएस १०० व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात कार्यक्रम सोहळा पार पडला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १०० रुपयांचे विशेष नाणे आणि टपाल तिकिट जारी करण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत भारतीय चलनात असलेल्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे. तर नाण्यांवर सत्यमेव जयते असे लिहले असून अशोक स्तंभाची प्रतिमा आहे. मात्र नुकतेच जारी केलेल्या १०० रुपयाच्या नाण्यावर कुणाहिओ प्रतिमा आहे. तसेच या नाण्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य काय आहे? याबाबत जाणून घ्या.


भारतात किती नाणी उपलब्ध आहेत?
सध्या भारतात ५० पैशांपासून २० रुपयांपर्यंतची नाणी चलनात आहेत. यापैकी १ रुपया, २ रुपया, ५ रुपया आणि १० रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात वापरली जातात. तर ५० पैशांचे नाणे आता दुर्मिळ झाले आहे. परंतु ते भारतीय चलन व्यवस्थेत कायदेशीररित्या वैध आहे. मात्र सरकारने अधिकृतपणे ते चलनातून काढून नसल्यामुळे त्याची कायदेशीर निविदा स्थिती कायम आहे.


१०० रुपयांचे नाणे जारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) १०० व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे एका विशेष समारंभात १०० रुपयांचे स्मारक नाणे आणि टपाल तिकिट जारी केले. या नाण्यावर भारत मातेची प्रतिमा आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच नाण्यावर भारत मातेची प्रतिमा आहे. त्यामुळे या नाण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या नाण्यावर एका बाजूला भारतीय राष्ट्रीय चिन्ह आणि दुसऱ्या बाजूला भारत मातेची प्रतिमा आहे, जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या राष्ट्राप्रती असलेल्या समर्पणाची भावना प्रतिबिंबित करते.
 
वैशिष्ट्य काय?
१०० रुपयाच्या नवीन नाण्याची रचना विशिष्ट प्रकारची आहे. ज्यामध्ये एका बाजूला भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आहे, तर दुसऱ्या बाजूला सिंहासह वरद मुद्रेत भारत मातेची आकर्षक मूर्ती आहे. तसेच भारतमातेच्या मूर्तीसमोर आरएसएस स्वयंसेवक नतमस्तक होऊन उभे असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर या नाण्यावर "राष्ट्राय स्वाहा, इदम राष्ट्राय इदम न मम." असे देखील लिहले आहे. हे आरएसएसचे ब्रीदवाक्य असून हे स्मारक नाणे आरएसएसच्या विचारसरणीचे आणि समर्पणाच्या भावनेचे प्रतीक असल्याचे स्पष्ट होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.