Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक :- मग मजा आली का? रुग्णालयात जमिनीवरच प्रसूती झाल्यानंतर नर्सची महिलेला विचारणा, 'अजून मुलं जन्माला घालणार का?'

धक्कादायक :- मग मजा आली का? रुग्णालयात जमिनीवरच प्रसूती झाल्यानंतर नर्सची महिलेला विचारणा, 'अजून मुलं जन्माला घालणार का?'
 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मदत करण्यास नकार दिल्याने एका गर्भवती महिलेने रुग्णालयाच्या जमिनीवरच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरिद्वारमध्ये ही घटना घडली असून, महिलेला रुग्णालयाच्या जमिनीवरच बाळंतपण करावं लागलं. गरीब कुटुंबातील या महिलेला मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला. तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी उपचार नाकारले. येथे प्रसूती होणार नाही असं त्यांनी महिलेला सांगितलं.

महिला रात्री 9.30 वाजता रुग्णालयात दाखल झाली होती. महिला यावेळी वेदनेने तडफडत होती. पण रुग्णालयातील कोणीही मदतीसाठी आलं नाही. अखेर तिला रात्री 1.30 वाजता जमिनीवरच आपली प्रसूती करावी लागली. महिला गरीब कुटुंबातील आहे. मंगळवारी रात्री उशिरा ती पोहोचली असता दाखल करण्यास नकार देण्यात आला. तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी उपचार नाकारले. येथे प्रसूती होणार नाही असं डॉक्टरांनी महिलेला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णालयात पोहोचलेल्या महिलेच्या कुटुंबातील सदस्य सोनी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "आम्ही सकाळी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा तिने [गर्भवती महिलेने आणि तिच्या आणखी एका नातेवाईकाने] आम्हाला सांगितले की कोणीही तिला बेडवर झोपू दिले नाही," अशी माहिती त्यांनी दिली.
सोनी यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर तिथे उभ्या असलेल्या दोन परिचारिकांपैकी एकीने उपहासाने म्हटलं, "मजा आली? अजून मुलं जन्माला घालणार?" "असं कोण म्हणतं? जर बाळाला काही झालं असतं तर जबाबदारी कोणी घेतली असती? जमिनीतवरच तिची प्रसूती झाली. कोणत्याही रुग्णाला असं वागवलं जाऊ नये अशी आमची मागणी आहे. लोक आनंदाने नव्हे तर दुःखात येथे येतात," असंही त्यांनी म्हटलं. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये महिला वेदनेने ओरडताना आणि जमिनीवर झोपलेली दिसत आहे. नातेवाईकांपैकी एक वृद्ध महिला तिला मागून पकडत मदत करत आहे. यादरम्यान रुग्णालयातील कोणताही कर्मचारी आजूबाजूला दिसत नाही.

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. सिंह म्हणाले, "मी महिला रुग्णालयाकडून प्राथमिक अहवाल घेतला आहे आणि सविस्तर लेखी उत्तराची वाट पाहत आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिलेला रात्री 9.30 च्या सुमारास आणण्यात आले आणि पहाटे 1.30 वाजता आपत्कालीन कक्षात प्रसूती करण्यात आली. व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळली जात आहे. तथापि, जर काही निष्काळजीपणा आढळला तर कठोर कारवाई केली जाईल."
मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी पुष्टी केली की रात्रीच्या ड्युटीवर असलेल्या कंत्राटी डॉक्टर डॉ. सोनाली यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे आणि दोन परिचारिकांना या घटनेतील त्यांच्या भूमिकेबद्दल अधिकृत नोटीस पाठवल्या आहेत. आपत्कालीन स्थितीत असलेल्या गर्भवती महिलेला प्रवेश न देण्याचे कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.