पिंपरी: जर तुमच्याकडे २० वर्ष जुने वाहन असेल तर तुम्हाला दुप्पट शुल्क भरावे लागेल. यामुळे जुनी वाहने वापरणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसणार आहे.अनेक नागरिक आपल्या वाहनंाना खूप जपतात आणि वर्षा नु वर्षे चालवितात. अनेक जुनी वाहने अजूनही सुस्िथतीत
असल्याचे दिसून येते. मोटार वाहन कायद्यानुसार १५ वर्षांनंतर वाहनांची
पुनर्नोंदणी अनिवार्य आहे. केंद्र सरकारने या कायद्यात बदल केला असून २०
वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी दुप्पट शुल्क
केले आहेत. १५ वर्षानंतरच्या वाहनांची पुनर्नोंदणी ५ वर्षासाठी ग्राह्य
असते. वाहनाचा फिटनेस असेल तर पुढील ५ वर्षांसाठी पुनर्नोंदणी करता येते.
मात्र, शासनाने २० वर्षानंतरच्या
वाहनांसाठी पुनर्नोंदणी शुल्क वाढवले आहेत. तसेच त्या व्यतरिक्त पर्यावरण
शुल्कही पुनर्नोंदणी वेळी आकारले जातात.१५ वर्षांनंतर पुनर्नोंदणीसाठी उशीर
केल्यास दंड आकारला जातो. दुचाकी वाहनांसाठी दरमहा ३०० रुपये आणि चारचाकी
वाहनांसाठी ५०० रुपये दंड लागणार आहे. त्यात आता २० वर्षानंतर
पुनर्नोंदणीसाठी दुपटीने शुल्क वाढविले आहेत.
हजारो नागरिक वापरताहेत जुनी वाहने..
गेल्या काही वर्षांमध्ये वाहन कर्ज सुलभ झाल्याने नागरिक सहजरित्या नवे वाहन खरेदी करतात. बहुतेक नागरिक दहा वर्षांहून अधिक वाहन वापरत नसल्याचे दिसून येते. परंतु निम्न मध्यमवर्गीय तसेच एखाद्या वाहनाविषयी असलेल्या जिव्हाळ्यापोटी अनेकजण कित्येक वर्षे आपले जुने वाहन सुस्िथीत ठेऊन वापरतात. शहरात खासगी तसेच व्यावसायिक वाहने खूप जुनी असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे काही जुन्या परंतु उत्पादन बंद झालेल्या दुर्मीळ वाहनांना अजूनही मागणी आहे.अशा वाहनांवर वाहनप्रेमी मोठ्या प्रमाणात खर्च करुन त्यांना चालू स्िथतीत ठेवतात. उदाहरणार्थ दुचाकीमधील जुन्या बुलेट, यामाहाची आरएक्स १०० व इतरही काही दुचाकी अजूनही वाहनप्रेमींच्या मनाला भुरळ घालतात. तसेच शहरात विटेंज कार बाळगणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी असलेली सुमारे ३२ हजार वाहने १५ वर्षे जुनी आहेत. त्यातील २० वर्षे जुन्या वाहनांची संख्याही मोठी आहे.
२० वर्षे जुन्या वाहनांसाठी नोंदणी शुल्क
वाहन प्रकार – शुल्क (रुपये)
-दुचाकी – २०००
-तीनकी – ५०००
-चारचाकी – १०,०००
-इतर वाहने – १२,०००
-इम्पोर्टेड दुचाकी – २०,०००
-इम्पोर्टेड मोटार – ८०,०००
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.