Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, 'ख्रिसमस' मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

"दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, 'ख्रिसमस' मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!
 

अयोध्येत होणाऱ्या भव्य दीपोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येस समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिवे आणि मेणबत्त्या पेटवण्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले की, राम मंदिर आंदोलन विरोध करण्याचा आणि हिंदूविरोधी भावना पसरवण्याचा समाजवादी पक्षाचा इतिहासच आहे.

लखनऊ येथील समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नावर उत्तर देताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, "मला कोणतेही सूचना करायच्या नाही, परंतु मला भगवान रामाच्या नावाने एक सूचना करायची आहे. जगभरात, ख्रिसमसच्या वेळी शहरे प्रकाशित केली जातात आणि हे महिनाभर चालू राहते. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. दिवे आणि मेणबत्त्यांवर इतके पैसे का खर्च केले जातात आणि इतके डोकं का लावायचं? या सरकारकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? ते हटवले पाहिजे. आमचे सरकार सत्तेत आल्यावर, आम्ही सुंदर रोषणाईची व्यवस्था करू."

तर अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाल यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, "ज्या पक्षाने राम मंदिर चळवळीला विरोध करण्याचा, अयोध्याला वर्षानुवर्षे अंधारात ठेवण्याचा आणि रामभक्तांवर गोळीबार करण्याचा अभिमान बाळगला होता, तो पक्ष आता दीपोत्सवासाठी शहराच्या सजावटीला विरोध करत आहे. सैफईमध्ये त्यांनी उत्सव साजरा केला तेव्हा त्यांना अभिमान वाटला, ज्यामुळे सामान्य लोकांना कोणताही फायदा झाला नाही." 
 
अयोध्येत दीपोत्सवाची यंदा नववी वेळ आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी, शरयू नदीच्या काठावरील ५६ घाटांवर २६,११,१०१ मातीचे दिवे प्रज्वलित केले जाणार आहे. दीपोत्सव २०२५ मध्ये २६ लाख दिवे, २,१०० वैदिक विद्वान, १,१०० ड्रोन आणि ३३,००० स्वयंसेवक शिस्त आणि सामूहिक भक्तीचे नेत्रदीपक प्रदर्शन करतील.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.