कुत्र्याला वाचवताना कार भिंतीला धडकली : सांगलीचा एकजण ठार मिरजेतील वंटमुरे कॉर्नरजवळ मध्यरात्री अपघात, तिघे गंभीर जखमी
शहरातील सांगली रस्त्यावरील वंटमुरे कॉर्नर येथे कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार भिंतीला धडकून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विश्वजीत दिलीप नाईक (वय 21, रा. 100
फुटी, सांगली) असे मृताचे नाव आहे. तर ओंकार सुनील पाटील, वैभव नंदकुमार
पाटील आणि अनिकेत आशिष कुमामेकर हे गंभीर जखमी झाले. विश्वजीत व जखमी हे
सांगलीतून मिरजकडे निघाले होते.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास ते मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे आल्यानंतर अचानपणे त्यांच्या कारसमोर भटके कुत्रे आले. यावेळी कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्नात असताना विश्वजीत याचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट रस्त्याकडे असलेल्या डिजीटल फलकावर व भींतीवर जावून आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामध्ये विश्वजीत याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.