Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव घेत महेश मांजरेकर यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा गौप्यस्फोट

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव घेत महेश मांजरेकर यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा गौप्यस्फोट
 

सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत महेश मांजरेकर यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा नावाचा देखील उल्लेख केला. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी बाळासाहेबांनी 2009मध्ये दिलेल्या ऑफरबाबत गौप्यस्फोट केला आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट महेश मांजरेकर यांनी केला आहे. झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी बाळासाहेबांनी 2009मध्ये दिलेल्या ऑफरबाबत हा गौप्यस्फोट केला. बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेलो असताना त्यांनी शिवसेनेत येण्याची गळ घातली. पण राज ठाकरेंशी मैत्री असल्यानं त्या मैत्रीखातर आपण शिवसेनेत गेलो नसल्याचं त्यांनी सांगितले. त्यावेळी बाळासाहेबांना थेट नकार देता आला नाही त्यामुळं आपण तीन दिवस फोन बंद ठेवल्याचंही त्यांनी सांगितलं. 
 
महेश मांजरेकर यांनी विधिमंडळात जाण्याचे वेध लागलेत. राजकीय पक्षानं ऑफर दिल्यास विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारण्याची तयारी महेश मांजरेकरांनी दाखवलीये. त्यातही सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्रीपद दिल्यास त्या संधीचं सोनं करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कोणताही राजकीय पक्ष हे धाडस दाखवणार नाही अशी मिश्कील कोटी त्यांनी केली. पण सक्रिय राजकारणात जाण्याची इच्छा महेश मांजरेकरांनी बोलून दाखवलीये.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.