ऐन दिवाळीत अभ्यंगस्नानाच्या दिवशीच पाणीबाणी, सांगलीतील नागरिकांचा रिकाम्या बादल्या घेऊन पालिकेवर संताप
सांगली शहरात ऐन दिवाळीत पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अभ्यंगस्नानाच्या दिवशीच पाणी नसल्याने संतप्त नागरिक आणि माजी नगरसेवकांनी सांगली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासमोर रिकाम्या बादल्या घेऊन ठिय्या आंदोलन केले. 'हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण
म्हणजे दिवाळी आहे आणि याच दिवशी अखंड सांगलीमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा
नाहीये,' असा उद्विग्न सवाल आंदोलकांनी केला. महापालिकेच्या पाइपलाइनच्या
दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मात्र, सणाच्या दिवशी
प्रशासनाने कोणतेही नियोजन न केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत
आहे. प्रशासनाने टँकरचीही सोय न केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला
असून, त्यांनी थेट आयुक्तांना जबाबदार धरले आहे. हे आंदोलन मा. नगरसेवक
मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.