संघाच्या मिरवणुकीत हातात काठी घेऊन गणवेश घालून सहभाग घेणारा सरकारी अधिकारी निलंबित; राज्यात वादाची ठिणगी!
बंगळूर : सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्याक्रमावर कारवाई आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागावरून राज्यात  मोठा वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या मिरवणुकीत सहभागी लिंगसुगूर तालुक्यातील पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) प्रवीणकुमार याला निलंबित करण्यात आले आहे.
रोडलबांडा गावातील पंचायत विकास अधिकारी प्रवीणकुमार याने १२ ऑक्टोबर रोजी आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त लिंगसुगूर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गणवेश परिधान करून हातात काठी घेऊन सहभाग घेतला होता. या कृतीला सरकारी कर्मचाऱ्याने सेवावर्तन नियमांचे उल्लंघन केल्याचे मानून पंचायत राज विभागाच्या आयुक्त डॉ. अरुंधती यांनी त्यांना विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.