ठाण्यात महापालिकेत अतिक्रमण विभागात उपयाकुत् असलेल्या शंकर पाटोळे या अधिकाऱ्याला २५ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. घंटाळी परिसरात असलेलं अतिक्रमण हटवून बिल्डरला मदत करण्यासाठी ही लाच घेतली जात होती. बुधवारी रात्री उशिरा मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शंकर पाटोळे यांना अटक केली. त्यांना अटक करत असतानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. अटकेवेळी शंकर पाटोळे यांच्यावर फुलांची उधळण केली केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईत घंटाळी परिसरात एका बिल्डरची जागा आहे. या जागेवर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी शंकर पाटोळे यांनी लाच मागितली होती. तब्बल ५० लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यातले १० लाख घेतले होते. तर उरलेले ४० लाख रुपये देण्यापूर्वी बिल्डरने मुंबई एसीबीकडे तक्रार केली.
पाटोळे यांना बिल्डरने आपण ४० पैकी २५ लाख देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. यानंतर एसीबीच्या विशेष पथकानं बुधवारी सापळा रचला. शंकर पाटोळे यांना लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर कार्यालयातील कागदपत्रांची तपासणीसुद्धा करण्यात आलीय. पाटोळे यांच्या निवासस्थानीही एसीबीच्या पथकाने शोधमोहिम राबवली.
महापालिकेत अतिक्रमण विभागात उपायुक्त असलेल्या शंकर पाटोळे यांना तब्बल २५ लाखांची लाच घेताना अटक कऱण्यात आली. त्यांच्या अटकेवेळी अंगावर फुलं उधळली गेली. अधिकाऱ्याचा निषेध म्हणून ही फुलं तिथं आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून उधळण्यात आली. अधिकाऱ्याच्या नावाने घोषणाबाजीही केली गेली. आता या प्रकाराची चर्चा ठाण्यात सर्वत्र सुरू आहे.दरम्यान, ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू आहे. कोर्टानं आय़ुक्त सौरभ राव यांना कोर्टानं फटकारल्यानंतर या कारवायांना वेग आला होता. पण आता अनधिकृत बांधकांमांना अधिकाऱ्यांकडूनच संरक्षण दिलं जात असल्याचं या कारवाईमुळे समोर आलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.