खासदार संजय राऊत. मंत्री नितेश राणे. आमदार गोपीचंद पडळकर. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते. आमदार अनिल परब. रामदास कदम माजी मंत्री. आमदार संजय गायकवाड. खासदार म्हस्के सर्वच पक्षातील नेत्यांनी महाराष्ट्राची अब्रू देशाच्या चव्हाट्यावर मांडलं आहे. हे सर्व नेते स्वतःचे वैयक्तिक भांडणे दररोज प्रत्येक न्यूज चैनल वर प्रत्येकाने प्रत्येकाचे आई बहीण काढत आहेत समाजाच्या कामासाठी यांना आमदार केलं खासदार केलं समाजाचं काम राहिले बाजूला तर तो कसा मेला ह्यो कसा मेला. मंगळसूत्र कोण चोरलं चोरलेले मंगळसूत्र कोणाचे होतं असे अनेक अश्लील भाषेमध्ये एकमेकाची अब्रू चव्हाट्यावर मांडत आहेत.
एकमेकाचे खाजगी जीवन समाजासमोर येत आहे. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न उभे आहेत त्यामध्ये प्रमुख शेतकरी हा अतिवृष्टी मुळे देशोधडीला लागलेला आहे त्याविषयी कुठल्याही नेत्याला काही सुद्धा घेणे देणे नाही. महाराष्ट्र मध्ये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा तर अजिबात नाही बेरोजगारी भयानक वाढलेली आहे त्यामुळे दिवसाढवळ्या दरोडा पडत आहेत याची कुणाला काळजी नाही. आमदार खासदार मंत्री ही पद दुसऱ्याला शिव्या घालण्यासाठी तयार केलेले आहेत का असा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे. असल्या वाचाळ वीरांना कुठल्याही चॅनेलने समाजापुढे दाखवूच नये आणि प्रिंट मीडियाने यांच्या बातम्या छापू नये. त्याशिवाय या वाचाळ वीरांना महाराष्ट्राची संस्कृती काय आहे कळणार नाही.तुमचं वैयक्तिक भांडण एकमेकांच्या घरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये दररोज हळद खेळा आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही पण असले घाणेरडे वाक्य जनतेसमोर नाही आले पाहिजे अन्यथा प्रत्येक न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडिया यांनी शेतकऱ्यांचे आज होत असलेले हाल शासनासमोर मांडावे शेतकरी तुम्हाला हृदयापासून आशीर्वाद देईल आणि या वाचाल वीरांना संपूर्ण मीडियापासून दूर ठेवावे किंवा त्यांच्यावर बहिष्कार घालावा असे आव्हान सुभाष खोत माझी सभापती सांगली मार्केट कमिटी यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.