Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिंदूसेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्या घरावर बुलडोझर; विरोध करणाऱ्या महिलांना अत्याचाराची धमकी; नेमकं काय घडलं?

हिंदूसेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्या घरावर बुलडोझर; विरोध करणाऱ्या महिलांना अत्याचाराची धमकी; नेमकं काय घडलं?
 

हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई घर न्यायालयाची परवानगी नसतानाही पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर घर पाडायला विरोध करणाऱ्या महिलांचा विनभंग करुन विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व ३५ ते ४० गुंडांना सोबत घेऊन अत्याचाराची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार धनंजय जयराम देसाई यांच्या पौड येथील निवासस्थानावर विलास परमार नावाच्या व्यक्तीने महेश खाडे व ३५ ते ४० गुंड यांना घेऊन कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन व प्रशासकीय आदेश नसताना जे.सी.बी. ने घर पाडले. यावेळी घरामधे ९० वर्षांची वयस्कर व्यक्ती व महिला उपस्थित होते पैकी महिलांना व १४ वर्षीय मुलीला छाती, हाताला व कपड्यांना धरून बाहेर ओढत आणले त्यांचा विनयभंग केला आणि वृद्ध व्यक्तीस घरातच ठेवून घर पाडण्यास सुरुवात केली. 
 
अशा प्रकारचा भीषण त्रास घरातील लोकांना देत असताना काही लोक आडविण्यासाठी गेले असता महेश खाडे या व्यक्तीने आम्ही काहीही करू तुम्हाला काय करायचंय असे म्हटले व पोलीसांनी त्यांना पकडून ठेवले. आत ९० वर्षीय वृद्ध आहे हा प्रकार थांबवा असे सांगून देखील पोलीसांनी ते न थांबवता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा असा चुकीचा सल्ला दिल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.

पोलिसांना कळविताच ते तातडीने तिथे आले पण, त्यांनी पुर्णपणे एकतर्फी व बघ्याची भुमिका घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे, पोलीस प्रशासनाने ते घराचे पाडकाम का थांबविले का नाही? पोलीस प्रशासनाच्या या एकतर्फी भूमिकेमुळे त्या घरातील लोकांना भीषण त्रास सहन करावा लागलातरी वरील सर्व प्रकार लक्षात घेऊन क्रूर मनोवृत्तीच्या विलास परमार, महेश खाडे सोबत उपस्थित ३५ ते ४० गुंड याच्यावर दरोडा, घरफोडी, मरहाण व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व तिथे उपस्थित पोलीस अधिकारी यांच्यावर देखिल गुन्हा दाखल करुन त्यांची कसून चौकशी व्हावी.अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.