मुंबई : मित्रांमार्फत एका तरुणीसोबत रूपेश (बदललेले नाव) याची ओळख झाली. इंस्टाग्राम आणि नंतर मोबाइलची देवाणघेवाण झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. विवाहित असूनही तिने रूपेशला आपल्या मधाळ बोलण्याने जाळ्यात ओढले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून ती पैशांची मागणी करू लागली. सुरुवातीला रूपेशने पैसे दिले. मात्र नंतर पैसे देण्यास नकार देताच, तिने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची आणि मॉर्फिंग केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन रूपेशकडून दीड कोटी रुपये उकळले. या प्रकरणी तरुणीसह तिच्या कुटुंबियांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर मुंबईत वास्तव्यास असलेला आणि पेशाने वकील असलेला रूपेश हा जी-२० सह आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. मे २०२४ मध्ये काही मित्र रूपेशच्या घरी आले असतानास त्यांच्यासोबत पारुल नावाची तरुणीदेखील होती. मित्रांनी रूपेशची पारुलसोबत ओळख करून दिली. रूपेश आणि पारुल हे दोघे आधी इंस्टाग्रामवर चॅट करू लागले. मैत्री झाल्यानंतर, दोघांनी एकमेकांच्या मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण केली. एकमेकांसोबत बोलणे आणि नंतर भेटणेही सुरू झाले. घट्ट मैत्री झाल्यानंतर, पारूल वेगवेगळी कारणे सांगून रूपेशकडे पैसे मागू लागली. कधी कुणी आजारी आहे, तर कधी शूटिंगसाठी गरज आहे, अशा सबबी ती पुढे करू लागली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.