मुंबई :-व्यावसायिकाला 500 रुपयांत शरीर संबंधाची ऑफर; रूममध्ये घेऊन गेली, अजून तीन महिला आल्या अन् पुढे जे घडलं वाचून बसेल धक्का.
मुंबई: मुंबईत महिलांच्या एका टोळीने पुरुषांना फसवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात तिन महिलांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने याआधीही अशाच पद्धतीने अनेक पुरुषांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणात जळगाव येथील एका 46 वर्षीय
व्यावसायिकाला 35 हजारांना गंडवण्यात आलं. ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली.
याप्रकरणी व्यावसायिकाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन महिलांना अटक
केली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी मजिता बेबी नूर (वय 35), रूपा विश्वनाथ दास (वय 47) आणि नसीमा जमाल शेख (वय 38 ) या तीन महिलांना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
23 सप्टेंबर रोजी पीडित व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या कामानिमित्त मुंबईत आला होता. सीएसएमटी स्थानकावर त्याची एका महिलेशी ओळख झाली. त्यावेळी बोलत असताना महिलेने त्याला 500 रुपयांच्या मोबदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची ऑफर दिली. त्यानंतर व्यावसायिकाने ही ऑफर
स्वीकारताच, महिला त्याला गिरगाव परिसरातील भारत भवन हॉटेलजवळील एका
इमारतीत घेऊन गेली. तेथे वरच्या मजल्यावर पोहोचल्यानंतर स्वतःच आरडा-ओरडा
सुरु करून आपला व्हिडीओ व्यावसायिकाने शूट केल्याचा आरोप ती करू लागली.
खंडणीसाठी धमकी, ऑनलाईन पैसे वसूल
दरम्यान, आणखी तीन महिला तिथे येऊन पोहोचल्या. त्यांनी व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून 22 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करून घेतले. तसेच त्याच्या पाकिटातील 13 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. घटना घडल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही; मात्र त्यानंतर त्याने व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी ऑनलाईन ट्रान्सफरची तपासणी केली आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. या तपासातून पोलिसांनी मजिता बेबी नूर (वय 35), रूपा विश्वनाथ दास (वय 47) आणि नसीमा जमाल शेख (वय 38 ) या तीन महिलांना अटक केली आहे. या लुटारू टोळीत आणखी एक महिला सामील असल्याचा पोलिसांना संशय असून तिचा शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.