तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निलंगा पोलिसात सात जणांवर अॅट्रॉसिटीसह गुन्हे दाखल करत सर्वांना अटक केली आहे. मयत तरुणीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पौर्णिमा गोरोबा कांबळे (29) असे मयत
तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या
पौर्णिमाची डान्स क्लासेसच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये
प्रेमसंबंध जुळले. परंतु मुलगी मातंग समाजाची असल्याने या प्रेमविवाहला
मुलाकडील कुटुंबातील लोकांचा विरोध होता.
सूरज आणि त्याच्या कुटुबीयांनी तरुणीला जातीवाचक शिवीगाळही केली. त्यातच तिला दिवस गेल्याचे सांगितल्यानंतर सूरजने तिच्याशी संपर्क तोडला आणि तो पुण्याला गेला. पौर्णिमाचा फोन नंबरही सूरजने ब्लॉक करून ठेवला. अखेर मानसिक दबावातून तरुणीने खदानीत उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सूरज विजयकुमार मुळे (29), विजयकुमार शेषराव मुळे, शकुंतला विजयकुमार मुळे, धिरज विजयकुमार मुळे, ऑटोचालक अनिकेत याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.