संपूर्ण शरीर मातीने माखलेलं, केसांचा गुंता झालेला, पायात कडं अन् अंगावर एखाद दुसरा कापड, अशी व्यक्ती जर तुम्हाला कधी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात दिसली तर तुम्ही त्याला अवलीया म्हणाल. पण साधीसुधी व्यक्ती नसून अनेकांसाठी ते देवासमान आहेत. या व्यक्तीचं नाव आहे मस्तान बाबा. काही जण त्यांना 'सरकार'ही म्हणतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून हे मस्तान बाबा पुणे रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याचं सांगितलं जातं.
पुणे स्टेशनमध्ये कोणत्याही प्लँटफॉर्म वर किंवा पोलीस चौकीच्या बाकड्यावर ते बसलेले दिसतात. ही व्यक्ती कोणाशी बोलत नाहीत, कोणाला काही मागत नाहीत ते आपल्याच मस्तीमध्ये तल्लीन असतात, त्यांच्या दोन्ही पायात चांदीचे कडं आहेत. अनेक लोक त्यांचं दर्शन घेऊन जातात. ज्यांच्या नशीबात असेल त्यांनाच ते दर्शन देतात, असं दावा त्यांच्या भाविकांकडून केला जातो.हे मस्तान बाबा स्टेशनच्या आजूबाजूला कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन हाताने खायला घेतात. किंवा दुपारी कोणीतरी हॉटेलवाला येऊन त्यांना जेवण चहा देऊन जातो. याशिवाय रोज रात्री ते पार्सल गेट जवळ शेकोटी रुपी यज्ञ पेटवतात, असंही सांगितलं जातं. या मस्तान बाबांनी ३० वर्ष झाले अंघोळ केलेली नाही पण अंगाला सुगंध येतो, असा दावाही केला जातो.हे मस्तानबाबा नेमके कोण आहेत? ते कुठून आले? त्यांचा भूतकाळ काय? याबाबत कुणालाही फारशी माहिती नाही. पण त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यात सकारात्मक आणि चमत्कारीक बदल होतात, असं सांगितलं जातं. मस्तान बाबाला रोज सिगारेट लागते. त्यासाठी त्यांचे भक्त आठवणीने त्यांच्याासाठी सिरगरेट घेऊन जातात. मस्तान बाबा कुणाशीही फारसे बोलत नाही. असे हे मस्तान बाबा खरोखरच कुणाी अवलीया आहेत की दैवी अवतार हे सांगता येत नाही. पण या बाबांच्या दर्शनासाठी गरिब असो की श्रीमंत सर्व प्रकारचे लोक दूरदुरून दर्शनासाठी येतात. हे मात्र नक्की!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.