Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खानापूर शहरातील खोकी अतिक्रमण कारवाई विरोधात जिल्हाधिकारी यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदनदेण्यात आले.

खानापूर शहरातील खोकी अतिक्रमण कारवाई विरोधात जिल्हाधिकारी यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
 

खोकी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या. पर्यायी जागा उपलब्ध होई पर्यंत आहे त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी द्या .. भाई दिगंबर कांबळे. खानापूर शहरातील विजापूर गुहागर महामार्ग लगत गटारी बाहेर खानापूर येथील अल्पसंख्यांक समाज तसेच इतरांची गेली 20 ते 25 वर्षापासून छोट्या मोठ्या व्यवसायाची पत्राशेड दुकान खोकी होती .. उदरनिर्वाहासाठी अनेक जणांनी आपले व्यवसाय थाटले होते 

बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी खानापूर नगरपंचायत यांचेकडून सर्व दुकाने पाडण्यात आली..त्यामुळे सर्व खोकी धारकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.. सदरची खोकी ही गटारीच्या बाहेर असल्याने  तसेच वाहतुकीसाठी कोणताही अडथळा निर्माण होत असताना एवढी मोठी कारवाई का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. खानापूर  नगरपंचायत यांनी सर्व अतिक्रमण खोकी धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.. 

व जो पर्यंत पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तो पर्यंत..जिथे गेली अनेक वर्षापासून खोकी धारकांचा व्यवसाय सुरू होता तिथेच त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तातडीने प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे,व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाहीन शेख, अल्पसंख्याक सेल जिल्हाअध्यक्ष गवसभाई शिरोळकर ,इसाक मुजावर, जहांगीर पिरजादे, कासम पिरजादे, जमीर पिरजादे, सत्तार पिरजादे, नूरमहमंद पिरजादे, शकील पिरजादे, इकबाल पिरजादे, अमन पिरजादे व इतर सर्व खोकी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.