Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कारखान्याचे कोट्यवधी लाटले, नाचगाणं करणारीला २० कोटींचा स्टुडिओ बांधून दिला; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

कारखान्याचे कोट्यवधी लाटले, नाचगाणं करणारीला २० कोटींचा स्टुडिओ बांधून दिला; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप
 

बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघात केला. याला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तरही दिलं. दरम्यान, करुणा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मला न्याय मिळावा अशी मागणी केली. माझ्या लढाईत सोबत रहा अशी विनंती केल्याचं जरांगेंना सांगितलं. पण जरांगे पाटील यांनी मी महिलांना पुढे करत नाही, धनंजय मुंडेंसाठी मी सक्षम आहे असं सांगण्यात आल्याचंही करुणा मुंडे यांनी सांगितलं. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे समाजातील लोकांची माथी भडकावतात, जातीपातीचं राजकारण करतायत. समाजाला पुढे करतात पण स्वत: पुढे होत नाहीत अशी टीकाही करुणा मुंडे यांनी केली.


करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंनी अंगावर आले तर शिंगावर घ्या विधान केलंय तर पंकजा मुंडेंनी कोयते घासून ठेवा म्हटलंय. पण त्या दोघांनीही फक्त समाजातल्या लोकांना हे सांगितलंय. हे लोक स्वत: काही करत नाहीत. समाजाच्या नावावर खच्चीकरण चालू आहे. परळीत मी अर्ज भरलेला, माझ्या सूचकाला तुम्ही उचलून नेला. मी अंगावर आले होते पण माझा अर्ज बाद ठरवला. दमदाटी कशाला केली, मी अंगावर आली होती तर शिंगावर घ्यायचं होतं. झाली असती नवरा विरुद्ध बायको अशी निवडणूक. पण तुम्ही मोठी मोठी भाषणं ठोकली, समाजाची दिशाभूल करणं इतकंच केलं. 
 
जातीपातीचा मुद्दा, हिंदू-मुस्लिम, ओबीसी मराठा हे सगळे मुद्दे घेऊन राजकारण करतायत. स्थानिक निवडणुकीत रस्ता, नाले, वीज, पाणी, शेती, महिलांचे प्रश्न, रोजगार हे मुद्दे पाहिजेत. पण हे सर्व सोडून ते जातीपातीचे मुद्दे आहेत. समाजाच्या नावावर मतदान घ्यायचंय. समाजाच्या लोकांवर किती अन्याय झालाय. वैद्यनाथसह सगळ्या कारखान्यात मुंडे साहेबांकडे बघून जमीन दिली होती. पण धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी कारखाने विकले, लोकांचे ४० कोटी थकले असल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला.




कारखान्यात लोकांचे कोट्यवधी रुपये थकवणाऱ्यांनी मुंबईत मात्र नाचाणाऱ्या, गाणाऱ्या महिलेला २० कोटींचा डान्सिंग स्टुडिओ बांधून दिलाय. पण इकडं लोकांना कारखान्याचे पैसे मिळत नाहीयेत. वंजारी समाजातल्या लोकांची जमीन त्यात गेलीय. मोठे घोटाळे करतायत. न्याय भेटत नाहीय. ७०-७५ हजार वर्षे मागे चाललाय. शेतकऱ्यांना पीक विमाही मिळत नाही असंही करुणा मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे फक्त मोठे भाषण करतायत. समाजाचं नेतृत्व करत असल्याचं दाखवतोय. पण त्याचा खरा चेहरा समोर आणायचाय. दोन बायकांना प्रेग्नंट करून, सालीवर बलात्कार करणारा व्यक्ती. त्यानंतर ज्यावेळी बहिणीने घरात सांगितलं, माझी आई न्यायासाठी कोर्टात जाणार होती. त्यांच्यावर दबाव टाकला आणि त्यांनी दबावाखाली आत्महत्या केली. आत्महत्येनंतरही त्यांची अय्याशी थांबली नाही. बहिणींमध्ये भांडण लावून घाणेरडं काम सुरू ठेवलं. २०२२ मध्ये धनंजय मुंडेंनी मला सोडलं तेव्हा कोर्टात केस केली. त्यानंतर बहिणींने तोंड उघडलं.
 
जरांगे पाटील यांच्याशी भेटल्यानंतर काय झालं हे सांगताना करुणा मुंडेंनी सांगितलं की, मी पुरावे देणार होते, तुम्ही मला न्याय द्या असं मी त्यांना म्हणाले. जरांगे भाऊ राजकारणी नाहीत.मी त्यांची भेट घेतली, पण जरांगे भाऊंनी सांगितलं की, घरगुती मॅटरमध्ये पडत नाही. महिलेला पुढे करून धनंजय मुंडेवर टार्गेट करण्याची गरज नाही, मी एकटा सक्षम आहे.

सत्तेचा किती गैरवापर करताय. स्वत:च्या बायकोला न्याय देऊ शकत नाही, समाजाला काय न्याय देणार. फक्त जातीपातीत तेढ निर्माण करून पाच वर्षे जनतेवर अन्याय करणार. त्याने रात्री दोन वाजेपर्यंत बायको रोडवर फिरत आहे. मुलगा-मुलगी यांचाही गैरवापर करतोय. माझ्या मुलीकडून सही करून दिलं की मला नको आहे. २२ वर्षांचा मुलगा हातात काहीच काम नाही, तो तसाच बसला आहे. काम काही तरी करायला पाहिजे. पण बाप करू देत नाहीय. माझ्या मुलाच्या डोक्यावर घरात बसून काही परिणाम झाला तर कोण पाहणार असा सवाल करुणा मुंडे यांनी केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.