Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तब्बल 51 वर्षांनी उघडणार तो खजिना, संपूर्ण देशाचं मंदिराच्या गर्भगृहाकडे लक्ष!

तब्बल 51 वर्षांनी उघडणार तो खजिना, संपूर्ण देशाचं मंदिराच्या गर्भगृहाकडे लक्ष!
 

मथुरेत श्री बांके बिहारी मंदिरात मोठा खजिना आहे. या खजिन्याची जगभरात चर्चा असते. हाच खजिना आता उघडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या समितीच्या आदेशानुसार हा खजिना आता खोलण्यात येणार आहे.

दिवाणी कनिष्ठ न्यायाधीश, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, बांके बिहारी मंदिराचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा खजिना उघडण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या खजिन्यात हिरे, पन्ना, मोरनी हार, चांदीने तयार करण्यात आलेले शेषनाग, सोन्याच्या कलषात ठेवण्यात आलेले नवरत्न अशा अतिशय मौल्यवान आणि ऐतिहासिक वस्तू असण्याची शक्यता आहे. हा खजिना म्हणजे बांके बिहारी मंदिराचा एक मोठा आणि समृद्ध वारसा असल्याचे बोलले जात आहे.

 
सर्वात अगोदर 1971साली खजिना करण्यात आला बंद
मिळालेल्या माहितीनुसार मथुरेतील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील खजिना 54 वर्षांपासून बंद करून ठेवलेला आहे. 1971 साली न्यायालयाने एक आदेश दिला होता. या आदेशानुसार हा खजाना सील करण्यात आला होता. आता हाच खजिना सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीचीच्या आदेशानुसार आता उघडला जाणार आहे. हा खजिना खोलताना दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तेसच मंदिरातील पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हा खजिना उघडला जाणार आहे. खजिना उघडण्याच्या पूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे.

खजिन्यात काय-काय असेल? मूल्य काय?

या खजिन्यात अनेक मौल्यवाना हिरे आहेत. मोरही हार, चांदीपासून तयार करण्यात आलेला शेषनाग, सोन्याच्या लकषात असलेले नवरत्न आदी मौल्यवान वस्तू आहेत. हा खजिना बांके बिहारींच्या सिंहासनाच्या खाली गर्भग्रहात ठेवलेला आहे. आता हा खजिना खोलला जाणार असल्याने आता भक्तगण तसेच मंदिर समितीला मोठी उत्सुकता लागलेली आहे.
 
सगळ्यांनाच लागली उत्सुकता
दरम्यान, समस्त भारतात या मंदिरातील खजिना हा चर्चेचा विषय राहिलेला आहे. हा खजिना वाटतो त्यापेक्षा आणखी मोठा असल्याचे बोलले जाते. विशेषत: यात अनेक मौल्यवान वस्तू आहेत, असेही बोलले जाते. त्यामुळेच खजिन्यात आणखी कोण-कोणत्या गोष्टी असणार आणि सोबतच या खजिन्याची किंमत काय असेल? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.