Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत खून! दारू पिण्यावरून वाद, मित्रांनीच मित्राला संपवलं; दगडानं ठेचून-ठेचून...; संपवल

सांगलीत खून! दारू पिण्यावरून वाद, मित्रांनीच मित्राला संपवलं; दगडानं ठेचून-ठेचून...; संपवल
 

सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दगडाने ठेचून तरुणाला संपवण्यात आले. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. या हत्येच्या घटनेमुळे सांगलीच्या संजयनगर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या एका औद्योगिक वसाहतीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाचे नाव रोहित आवळे (वय २२ वर्षे) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दारू पिण्याच्या वादातून रात्रीच्या सुमारास तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी दगडाने ठेचून रोहितचा जीव घेतला. हे हल्लेखोर त्याचेच मित्र असल्याचे सांगितले जात आहे.

दारू पित असताना रोहित आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून रात्रीच्या सुमारास मित्रांनी रोहितवर हल्ला केला, दगडाने ठेचून रोहितची निर्घृणपणे हत्या करण्यात आली अशी माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. 


सांगलीत एका तरुणाचा दगडाने ठेचून मारण्यात आले. हा तरुण मित्रांसह दारू पित होता, दारू पिण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. मित्रांनी त्याच्यावर हल्ला केला. दगडाने ठेचून या तरुणाला संपवण्यात आले. तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाला सुरुवात केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.