कधी काळी बाल विवाह ही एक मोठी सामाजिक समस्या होती. आता बाल विवाहांचे प्रमाण कमी आले आहे. मात्र बुजूर्ग व्यक्ती आपला वयाच्या सत्तरी अन् पंचाहत्तरीत देखील आपला संसार थाटण्याच प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. विशेष म्हणजे या ७५ वर्षांच्या पुरूष बुजूर्गांची लग्न ही तरूण महिलांसोबत होत आहेत.
अशाच एका ७५ वर्षाच्या आजोबांनी ३५ वर्षाच्या महिलेसोबत संसार थाटला. या संसागाची अख्या गावात चर्चा सुरू होती. हे आजोबा जैनपूरमधील कुछमुछ गावचे आहेत. त्यांचं नाव संगरू राम असं आहे. त्यांनी ३५ वर्षाच्या मनभावती यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर पहिली रात्र आली. मात्र हीच पहिली रात्र संगरू राम यांची शेवटची रात्र ठरली. मधुचंद्राच्या रात्रीनंतर अचानक ७५ वर्षांच्या संगरू राम यांचं निधन झालं.
संगरू राम यांच्या पहिल्या पत्नीचं निधन खूप पूर्वी झालं होतं. त्यांना मुलबाळ नव्हतं. या घटनेनंतर संपूर्ण गाव स्तब्ध झालं आहे. दरम्यान, संगरू राम यांच्या भाच्यानं त्यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यानं संगरू राम यांचा अंत्यविधी देखील रोखून धरत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली.उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील या घटनेची देशभरात चर्चा होत आहे. गावात या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. संगरू राम यांच्या पहिल्या पत्नीचं निधन हे एका वर्षापूर्वी झालं होतं. संगरू यांना कोणतंही अपत्य नव्हत. ते एकटेच शेती करून आपला उदर निर्वाह करत होते. त्यांचे भाऊ आणि भाचा हे दिल्लीत राहून व्यवसाय करतात.गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संगरू राम गेल्या काही दिवसांपासून दुसरं लग्न करायचं आहे असं सांगत होते. मात्र गावकऱ्यांनी त्यांना तुमचं खूप वय झालं आहे असं सांगत सजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणचं ऐकलं नाही. त्यांनी सोमवारी जलालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या ३५ वर्षाच्या मनभावती यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर त्यांनी मंदीरात जाऊनही सात फेरे घेतले.
मनभावतीनं सांगितलं पहिल्या रात्री काय झालं
मनभावती यांचं देखील हे दुसरं लग्न होतं. पहिल्या लग्नापासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत. मनभावती यांनी सांगितलं, संगरू यांनी मला सांगितलं होतं की तू फक्त माझं घर सांभाळ मी तुझ्या मुलांची जबाबदारी उचलतो. लग्न झाल्यावर पहिल्या रात्री खूप उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो होतो. मात्र सकाळी त्यांच्या अचानक तब्येत बिघडली. त्यांना रूग्णालयात घेऊन गेलो असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर गावात खळबळ माजली आहे. संगरू राम यांच्या भाच्यानं हे संपूर्ण प्रकरण संदिग्ध असल्याचं सांगितलं. त्यांनी अंतिम संस्कार देखील थांबवला आहे. आता या प्रकरणी पोलीस तपास करत असून आता ते शवविच्छेदन करणार का हा प्रश्न आहे. या घटनेनंतर गावभर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.