Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुरग्रस्त बळीराजाला मोठा दिलासा! ओला दुष्काळबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा

पुरग्रस्त बळीराजाला मोठा दिलासा! ओला दुष्काळबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा
 

राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने बळीराजाचा संसार उघड्यावर पडला आहे. राज्यात महापुराने थैमान घातलेले असतानाच आज झालेल्या मंत्रिमंडळात सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. विशेषता गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले याबाबतचचा आढावा घेतला. जवळपास ६० लाख हेक्टरचे क्षेत्र नुकसान झाले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातला जे काही नुकसान होते त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेले आहे. ही केवायसी चे जे काही पाठवते ती शिथिल करून ॲग्री स्ट्रक्चर रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे," असं मुख्यमंत्री म्हणालेत. 
 
"पुढच्या दोन तीन दिवसात सर्व माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना करायची मदत असेल खरडून गेलेली जमीन, विहिरी, घरांची मदत, तातडीची मदत अशा वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेले असेल त्याचा अभ्यास करुन ती सर्व मदत दिवाळीपूर्वी सर्व मदत पोहोचवली जाईल असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिएंट्स पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करु," अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 
दुष्काळाच्या सर्व सवलती मिळणार!

दरम्यान, सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापी, आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपायोजनाने सवलती आपण देतो. त्या सगळ्या सवलती आता यालाही हे दुष्काळसं झाले. टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.