Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीसह तेलंगणा, कर्नाटकात घरफोडी करणाऱ्या टोळीचा छडा सराईतांना अटक:, सांगली एलसीबीची कारवाई

सांगलीसह तेलंगणा, कर्नाटकात घरफोडी करणाऱ्या टोळीचा छडा सराईतांना अटक:, सांगली एलसीबीची कारवाई
 

सांगली जिल्ह्यासह तेलंगणा, कर्नाटकात घरफोडी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १३ गुन्हे उघडकीस आणत कारसह १०.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. आकाश कल्लाप्पा काळे (वय २७, रा. सातारा रोड, जत), सचिन अभिमान काळे (वय ३२, रा. यल्लमावाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), दत्ता संपत चव्हाण (वय ५४, रा. सातारा रोड, जत), गोविंद राजू काळे (वय २८, रा. उमराणी रोड, जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथकाला इस्लामपूर येथील कुसूम वायदंडे यांच्या घरातील ऐवज चार संशयितांनी चोरल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने चौघांनाही ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर आकाश काळे याने कार (एमएच १२ पीझेड २१९८) मधून चौघांनी इस्लामपूरसह इतर ठिकाणी घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर कार ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तेलंगणा, कर्नाटकातील घरफोडीच्या गुन्ह्यांसह इस्लामपूर येथील सात, विटा येथील एक, आटपाडी येथील तीन, कडेगाव येथील एक, पेठवडगाव येथील एक असे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. त्यांच्याकडून कारसह चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने, चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा १०.३१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, संदीप पाटील, अरूण पाटील, सोमनाथ गुंडे, अतुल माने, रणजित जाधव, प्रकाश पाटील, शिवाजी शिद, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, रोहन घस्ते, अभिजित ठाणेकर, केरूबा चव्हाण, अभिजित माळकर, संकेत कानडे, कुरळप पोलिस ठाण्याकडील संदीप पाटील, प्रवीण धोत्रे, सूरज थोरात, सायबर पोलीस ठाण्याकडील करण परदेशी, अजय पाटील, अभिजित पाटील, शांता कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.