Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :- भररस्त्यात तरुणीला बेदम मारहाण, कोणीच मदतीला आलं नाही; Video Viral! गुप्तांगाजवळ...

पुणे :- भररस्त्यात तरुणीला बेदम मारहाण, कोणीच मदतीला आलं नाही; Video Viral! गुप्तांगाजवळ...
 

एकीकडे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवीचा जागर केला जात असून अनेक ठिकाणी कर्तृत्वान महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळे सुरू आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे राज्याची संस्कृतिक राजधानीचं शहर अशी ओळख असलेल्या पुण्यामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही पडेल.

आधी तिच्या कानाखाली मारली अन् नंतर...

पुण्याच्या रस्त्यावर एका तरुणाने अगदी फ्री स्टाइल कुस्तीप्रमाणे एका तरुणीला भररस्त्यात मारहाण करताना दिसत आहे. एखाद्या दानावाप्रमाणे या तरुणाने एका तरुणीला सर्वांसमोर अगदी लाथा- बुक्क्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. एका किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला आधी कानशिलात लगावली. नंतर या तरुणाने तरुणाला पकडून खेचण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिची हात झटकला. त्यानंतर ही तरुणी रिक्षात बसून निघणार होती तर हा तरुण त्या रिक्षाजवळ गेला आणि तिला काहीतरी बोलला.

गुप्तांगाजवळ मारली लाथ अन्...
त्यानंतर ही तरुणी बसलेली रिक्षा जागेवरुन हललीच नाही. ही तरुणी खाली उतरुन त्या तरुणाकडे चालत गेली. या तरुणाने उडी मारुन तिच्या कंबरेखाली गुप्तांगाजवळ लाथ मारली. मात्र वेळीच थोडी मागे सरकल्याने तिला जोरदार मार लागला नाही. नंतर हा तरुण बाईकवर बसून कोणाला तरी फोन करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर त्याच्यापासून दूर काही अंतरावर उभं राहून मारहाण होत असलेले तरुणीही कोणाला तरी फोन करताना दिसतेय. या दोघांमधील मारहाण पाहून बघ्यांची गर्दी होत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. बघ्यांपैकी कोणीही पुढे येऊन या वादात पडण्याचा किंवा तरुणाकडून तरुणीला होणारी मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

कुठे घडली ही घटना?

ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगरला जाण्यासाठी मार्गावर घडली. आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली? मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे? याबद्दलची कुठली ही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या पुण्यात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

तक्रार नाहीच
रात्री उशिरापर्यंत कुठली ही तक्रार प्राप्त न झाल्याची माहिती सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली. असं असलं तरीसुद्धा या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात जातोय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.