Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुनी पेन्शन योजना कायमची बंद होणार?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुनी पेन्शन योजना कायमची बंद होणार?


सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, आता केंद्र सरकारने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आता जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होणार नाही.दरम्यान, नवीन पेन्शन योजना आणि युनिफाइड पेन्शन योजना सुरु असणार आहे.



जानेवारी २००४ मध्ये जुनी पेन्शन योजना संपुष्टात आणली. यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. यामध्ये सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या दोघांच्या पगारातून पैसे जमा केले जातात. दरम्यान, जुन्या पेन्शन योजनेत सरकार पैसे जमा करत होते. यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आणि जुनी पेन्शन योजना सरकारवर भारी पडली. 

यानंतर २१ वर्षानंतर पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली गेली.यावर तोडगा म्हणून सरकारने १ एप्रिलपासून युनिफाइड पेन्शन योजना लागू केली. यामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजनेअंतर्गत काही फायदे मिळतात. दरम्यान, यूपीएस योजनेत तुम्हाला पगारातून ठरावीक रक्कम भरावी लागणार आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी पेन्शनची गॅरंटी मिळते.

मिडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने आता अधिक पारदर्शक आणि शाश्वत पेन्शन प्रणाली म्हणून एनपीएस आणि यूपीएस योजना एकत्रित करण्याचा विचार करत आहे. यूपीएस आणि एनपीएससारखीच गुंतवणूक कायम असेल. परंतु कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन देईल. ज्यामुळे निवृत्तीनंतर तुम्हाला स्थिर उत्पन्न मिळेल. यामुळे कर्मचारी आणि अर्थव्यवस्था यासाठी योग्य आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.