Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं?

...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं?


मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीची घोषणा केली. ही निवडणूक ईव्हीएमवर होणार आहे. एकीकडे विरोधक मतदारयादीत सुधारणा करण्याची मागणी करत असताना आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं की, मला आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप कोणीतरी पाठवली. ती व्हिडिओ क्लिप पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. आता माझी १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे'.

'दुबार मतदार नोंदणी ते मतदारयादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोग एकही उत्तर देत नाही किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

'जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहेत. आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदाचं करायचं काय ? महाराष्ट्रातील जनतेने ही व्हिडिओ क्लिप जरूर पहावी. तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, असं त्यांनी म्हटलं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.