Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क 5 पोलीसांची घरे लुटली, महाराष्ट्राला हादरुन टाकणारी चोरी; A टू Z उचलून नेलं; काय घडलं?

चक्क 5 पोलीसांची घरे लुटली, महाराष्ट्राला हादरुन टाकणारी चोरी; A टू Z उचलून नेलं; काय घडलं?


बुलढाणा शहरात सध्या गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. रोज नव नवीन घटना घडत आहेत. त्यामुळे बुलढाण्यातील सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता जनसेच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीसांचीच घरे सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

बुलढाणा शहरातील पोलिस लाईन मध्येच पाच पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी पोलीसांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करत चोरी केली. चोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

ASI गजानन वारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना शेख, पोलिस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम चोरली. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूलाच ही चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस सुद्धा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.