Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking :-सांगलीत राडा..! मतमोजणी आकडेवारीत तफावत; स्ट्र्राँग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा पहारा

Big Breaking :- सांगलीत राडा..! मतमोजणी आकडेवारीत तफावत; स्ट्र्राँग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा पहारा


सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय स्ट्राँगरुम हॉलसमोर बहुसंख्य नागरिक आणि कार्यकर्ते जमा झाले. मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप मतदार व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला.


आष्टा नगरपरिषदेसाठी एकूण मतदारसंख्या 30,574 एवढी आहे, तर झालेले मतदान 22,864 एवढे आहे. परंतु, नगरपालिकेची निवडणूक मतदार यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये, जवळपास 2 हजारपेक्षा अधिक मतांचा फरक असल्याचा आरोप केला. पोर्लटवरुन मिळालेल्या यादीत एकूण मतसंख्या 33 हजार 328 दाखवली आहे. एका प्रभागात 1311 मतदार असताना 4077 मतदारसंख्या दाखवली आहे. प्रभाग 6 मध्ये एकूण 3056 मतदारांची संख्या आहे. 

झालेले मतदान 2394 आहे, पण पोर्टलवर 1795 दाखवले आहे. अशा अनेक त्रुटी आढळल्याने आष्टा शहर विकास आघाडीच्या वैभव शिंदे यांनी स्ट्राँग रुमबाहेर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान, आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल शिंदे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.

तर, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि महायुतीकडून प्रवीण माने हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. स्टाँग रुमबाहेर 24 तास सीसीटीव्ही पाहिजे, प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी स्ट्राँग रुममबाहेर असला पाहिजे, या भागात जॅमर बसवा. पहिल्या रात्री हा गोंधळ तर पुढे काय होईल, असा सवाल संतप्त पदाधिकारी व उमेदवारांना यावेळी उपस्थित केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.