सांगली : येथील सांगली अर्बन बँकेच्या टिंबर एरिया शाखेत पाचशे रुपयांच्या एकोणीस बनावट नोटांचा भरणा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राशद जावेद मुल्ला (वय ४९, रा. अभिनव शाळेजवळ, शामरावनगर, सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत रोखपाल विश्वास आत्माराम पाटील (रा. हरूगडे प्लॉट, सांगलीवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी ११:३० च्या सुमारास बँकेच्या टिंबर एरिया शाखेत खातेदार राशद मुल्ला यांनी पाचशे रुपयांच्या एकोणीस नोटांचा भरणा केला होता. मात्र, सदर नोटा बनावट असल्याचे तपासणीत बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. बुधवारी रात्री याबाबत पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुल्ला याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.