Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू पिण्यापूर्वी काही थेंब हवेत का शिंपडले जातात? अट्टल मद्यप्रेमींनाही माहिती नसेल

दारू पिण्यापूर्वी काही थेंब हवेत का शिंपडले जातात? अट्टल मद्यप्रेमींनाही माहिती नसेल


भारतासह जगभरात दारू खूप लोकप्रिय आहे. तुम्ही अनेकदा मद्यप्रेमींना दारू पिण्यापूर्वी बोटांनी ग्लासमधून काही थेंब हवेत शिंपडताना पाहिले असेल. आजही लोक ही प्रथा पाळतात. महत्त्वाची बाब म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि देशांमध्येही ही प्रथा पाळली जाते.

पण असे का केले जाते असा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात आला असेल. मात्र अट्टल मद्यप्रेमींनाही या प्रश्नाचे उत्तर माहिती नाही. या क्रियेला लिबेशन म्हणतात. असे का केले जाते आणि किती देशांमध्ये ही प्रथा अस्तित्वात आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दारू शिंपडण्याची प्रथा कशी सुरु झाली?
हवेत दारू शिंपडण्याच्या क्रियेला लिबेशन असे म्हणतात. केंब्रिज डिक्शनरीमध्ये लिबेशन म्हणजे एखाद्या देवतेच्या किंवा मृत व्यक्तीच्या सन्मानार्थ शिंपडलेले मद्य. या प्रथेमागील कारण म्हणजे दारू शिंपडून कुटुंब आणि परिसराच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे असे मानले जाते. त्यामुळे दारू पिण्यापूर्वी लोक मद्याचे काही थेंब शिंपडतात.

अनेकांना माहिती नसेल, मात्र भारतात भैरवनाथाला मद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, दारू यासाठी शिंपडला जाते की यामुळे यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनाची काळजी घेतली जाईल आणि वाईटापासून रक्षण करेल. कालांतराने ही प्रथा सामान्य झाली. यामागे जगभरातील विविध देशांमध्ये वेगवेगली कारणे आहेत.
इतर देशांमध्ये काय आहे कारण?

दारू पिण्यापूर्वी मद्य हवेत शिंपडण्याची परंपरा इजिप्त, ग्रीस आणि रोममध्ये देखील आहे. असे करताना जे नातलग आता आपल्यात नाहीत त्यांच्या आत्म्यांची आठवण काढला जाते. क्युबा आणि ब्राझीलमध्ये देखील दारू हवेत शिंपडला जाते. या देशांमध्ये याला पारा लॉस सॅंटोस म्हणतात, ज्याचा अर्थ ‘संतांसाठी’ असा आहे. याचा अर्थ संतांसाठी दारूचे शिंतोडे हवेत उडवले जातात. फिलीपिन्समध्ये या प्रथेला पारा सा यावा म्हणतात. याचा अर्थ दारूचा काही भाग सैतानाला अर्पण करणे.

वाईट नजरेपासून बचाव होतो असा दावा
दारू हवेत शिंपडण्यामागे असाही विश्वास आहे की, दारू पिण्यापूर्वी काही थेंब जमिनीवर शिंपडल्यास वाईट नजर किंवा नकारात्मकता दूर होते. नकारात्मकता दूर झाल्यास सर्वकाही शुभ आणि चांगले होईल असे मानले जाते. दारू हवेत उडवण्याची प्रथा पुढील पिढ्यांनाही सांगितली जाते. त्यामुळे ती आतापर्यंत अशीच सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.