सांगली : मंदिरातील लक्ष्मी देवीच्या मूर्तीवरील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणार्या तरूणास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आष्ट्याजवळ अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी रविवारी दिली. वाळवा तालुक्यातील शिगाव येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरातून मंगळसूत्र चोरीचा प्रकार दीड महिन्यापुर्वी घडला होता.
या चोरी प्रकरणी पोलीसांच्या पथकाने प्रकाश जगन्नाथ सदामते (वय ३२ रा. आमणापूर, ता. पलूस) याला अटक केली आहे. संशयित तरूण आज आष्ट्याजवळ मिरजवाडी येथे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीसांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मिरजवाडी येथे पोलीसांनी सापळा लावला होता. यावेळी चोरीचे मंगळसूत्र विक्रीसाठी आलेल्या संशयित तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेउन चौकशी केली असता शिगावच्या मंदिरातील लक्ष्मी मूर्तीवरील पाच गॅ्रम वजनाचे मंगळसूत्र चोरल्याची त्याने कबुली दिली असल्याचे निरीक्षक श्री. झाडे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.