Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओळखीचा गैरफायदा घेऊन घडलेला प्रकार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, फिर्याद होताच सांगली पोलिसांची तात्काळ कारवाई

ओळखीचा गैरफायदा घेऊन घडलेला प्रकार; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, फिर्याद होताच सांगली पोलिसांची तात्काळ कारवाई


सांगली : भेटायला म्हणून बोलवून घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित सरफरोश असलम समलेवाले (वाघमोडेनगर, कुपवाड) याला अटक केली आहे.

त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित मुलगी १४ वर्षे ७ महिने वयाची असून ती कुटुंबीयांसह शहरातील एका उपनगरात राहते. संशयित सरफरोश समलेवाले कुपवाडमधील एका कापड दुकानात काम करतो. दुकानदार व पीडित मुलीच्या पालकांचा एकमेकांशी परिचय आहे. पीडित मुलगी व संशयिताची गणेशोत्सवात ओळख झाली. 

ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने ऑगस्टमध्ये पीडित मुलीला भेटायला म्हणून विश्रामबागमधील एका शाळेजवळ बोलावून घेतले. तेथून तिला दुचाकीवर घेऊन एका लॉजमध्ये नेले, तेथे तिच्यावर बलात्कार केला. असाच प्रकार पुन्हा सप्टेंबरमध्येही घडल्याचे पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल होताच सांगली शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित सरफरोशला अटक केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.