मुंबई : महायुतीतील भाजपचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मंत्रालयातील दालनावर सार्वजनिक बांधकम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी बेधडकपणे कारवाई केली. त्यांचे दालन सील करण्याचे कडक पाऊल उचलल्याने मंत्रालयीन कर्मचाऱ्यात आश्चर्य करण्यात येत आहे.
मंत्री संजय सावकारे यांचे दालन मंत्रालयाच्या मुख्य ईमारतीत तिसऱ्या मजल्यावर आहे. सोमवारी रात्री आठनंतर त्यांचे कार्यालय उघडे आढळले. मंत्रालयाचा दारवान मंत्री व अधिकाऱ्यांची दालनांची तपासणी करत असताना त्याला मंत्र्यांच्या दालनासह खाजगी सचिव, स्वीय सहाय्य्यक व कर्मचारी बसतात तेथील लाईट्स सुरूच असून व दरवाजे सताड उघडे असल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ दालन बंद करून ऑफिस सील केल्याची नोटीस दरवाजावर चिकटवली.यानंतर मंगळवारी दारवानाने सार्ववजिक बांधकाम खात्याला लिखीत कळवले. परंतु कँबिनेट मंत्र्यांचे दालन असल्याने दुसऱ्या मजल्यावरील सार्ववजिक बांधकाम खात्याचे उपसचिव मात्र अद्याप आपल्याकडे लिखीत मिळाले नाही, असे सांगत हात झटकत आहेत. तसेच कोणीही कर्मचाऱ्यांनी सावकारेंच्या दालनावषयी प्रसारमाध्ययांकडे वाच्यता करू नये असेही त्यांनी बजावल्याचे समजते.
खरे कारण गुलदस्त्यात…
याबाबत वस्त्रोद्योग खात्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. वर्षषूर्तीनिमीत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व खात्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत असे बोलले जात असल्याने वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या सूचनेवरून सर्व महत्वाच्या फायली व कागदपत्रे मागवण्यात आली होती. त्यानुसार वस्त्रोद्योगच्या राज्यभरातील कार्यालयाकडून त्याची पूर्तता करण्यात आली होती. नुकतेच मंत्रालयतील डिजीआयपीआरकडून महात्मा फुले मंडळाची चित्ररितीची फाईल गहाळ झाल्याचे वृत्त राज्यभरांत प्रसारित झाल्यानंतर खळबळ माजली होती. त्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.