प्रत्येक रेसिडेंशियल सोसायटीचे स्वतःचे काही नियम असतात. जसं की, सेल्समनला गेटच्या आत येण्यास बंदी, सोसायटीच्या आवारात गाडी पार्क करण्यास मनाई, काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर निर्बंध, तर काही ठिकाणी मांसाहार केल्यास दंड. अर्थात काही नियम नक्कीच वादग्रस्त असतात. आणि अशाच एका नियमाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. घडलं असं की, बॅचलर तरुणांच्या फ्लॅटमध्ये दोन मुली रात्री थांबल्यामुळे त्यांना तब्बल ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आता तुम्हीच सांगा. सोसायटीचा हा नियम योग्य की अयोग्य? ही बॅचलर मुलं तुमच्याकडेच मदत मागत आहेत.
(फोटो सौजन्य - Pexels/pixabay.com)प्रकरण काय आहे?
ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. r/bangalore या रेडिट पेजवरील NoGod या अकाउंटवरून हा अनुभव शेअर करण्यात आला. या मुलांकडे त्यांच्या मैत्रिणी भेटायला आल्या होत्या. गप्पा मारता मारता रात्रीचे १२ कधी वाजले त्यांना कळलंच नाही. त्यामुळे एवढ्या उशिरा प्रवास करणं सुरक्षित नसेल म्हणून त्यांनी त्या मुलींना फ्लॅटवरच थांबायला सांगितलं.पण ही गोष्ट सोसायटी सदस्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी या तरुणांकडून ५ हजार रुपयांचा दंड आकारला. यातली लक्षवेधी बाब म्हणजे जर फॅमिली असेल तर कोणतेही असे नियम लागू होत नाहीत. त्यांच्या घरी कितीही मुली कितीही काळ राहू शकतात, त्यांना दंड आकारला जात नाही. पण बॅचलर मुलांना मात्र वेगळीच वागणूक दिली जाते.या व्हायरल पोस्टमध्ये तरुणांनी पुढे म्हटलं आहे की, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट दंड लावण्यात आला. ते फॅमिलीसारखाच मेंटेनन्स भरतात, मग बॅचलर्ससाठी वेगळे नियम का? असा सवाल त्यांनी केला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बहुतांश नेटकऱ्यांनी त्यांना सोसायटीचं घर सोडण्याचा सल्ला दिला आहे. कारण कितीही वाद घातले तरी सोसायटी सदस्यांच्या एकजुटीसमोर त्यांचं काही चालणार नाही. तर काहींनी थेट कायदेशीर मार्गाने धडा शिकवण्याचा सल्ला दिला आहे. असो, तुम्ही या तरुणांना कोणता सल्ला द्याल?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.