Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाहतूक पोलिसांचे थेट सिग्नल वर जनजागृती; हातात फलक घेऊन उभे असणाऱ्या वाहतूक पोलिसांची "गांधीगिरी" पाहून सुखद धक्का

वाहतूक पोलिसांचे थेट सिग्नल वर जनजागृती; हातात फलक घेऊन उभे असणाऱ्या वाहतूक पोलिसांची "गांधीगिरी" पाहून सुखद धक्का


नवी मुंबई : कितीही दंडात्मक कारवाई केली तरीही वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी अधिक प्रमाणात होतंच असते. त्या साठी वाहतूक विभाग जनजागृतीचे कार्यक्रमही आयोजित करतात. मात्र कार्यक्रम संपला कि काही वेळात विषय संपतो अशी अवस्था असल्याने आता तर थेट वाहतूक पोलीस सिग्नल वर हातात फलक घेत रांगेत उभे राहिले आहेत. या फलकांवर वाहतूक नियम पाळण्याविषय जनजागृती केली गेली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबविल्याने शहर भर त्याची चर्चा होत आहे.


१०० % शिक्षित असणाऱ्या नवी मुंबईतही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे सहज आढळून येतात. त्यात नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पहाटे पासून कृषी निगडित माल घेऊन शेकडो ट्रक सारखी जड अवजड वाहने धडकतात . त्यात अनेकदा माल उतरविण्यास जागा नसेल तर बाजार समिती बाहेर रस्त्याच्या कडेला वाट पाहत थांबतात. त्यात सकाळी सात आठ नंतर सामान्य वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु होते. त्यामुळे पहाटे पासून रात्री पर्यत या भागात जड अवजड वाहने हलकी वाहने रिक्षा टेम्पो, प्रवासी बस आणि मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांची रेलचेल असते.
त्यात रिक्षा आणि दुचाकी वाहने सिग्नल तोंडाने बेशिस्त पार्किग अचानक ब्रेक मारून गाडी थांबवणे असे प्रकार होत असल्याने छोटे मोठे अपघात होत असतात. त्यांना वाहतूक पोलीस वेळोवेळी तसेच विशेष कारवाई अंर्तगत कारवाई करत असतात. मात्र आता वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी करीत सिग्नल लाल दिवा लागला कि थांबलेल्या वाहन चालकांना वाहतूक नियमांचे महत्व पटवून देत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावर एका रांगेत आणि हातात फलक धरून उभे राहत आहे. या फलकांवर वाहतुकीचे नियम आणि त्याचे महत्व असणारे वाक्य ठळक अक्षरात लिहलेली आहेत.
या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी माहिती देताना सांगितले कि वाहतूक नियम अनेकांना माहिती असतात तर अनेकांना माहिती नसतात दोन्ही बाबतीत उजळणी होत असते त्यामुळे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनजागृती मोहीम सुरु केली आहे. यात वाहतूक नियमांच्या बाबत माहिती आणि महत्व विशद करणारे फलक घेत वाहतूक पोलीस केवळ उभे राहत नाहीत तर त्याबाबत थांबलेल्या वाहन चालकांशी संवाद साधत नियमांचे गांभीर्य पटवून देतात. केवळ दंड आकारणीच नव्हे तर जनजागृती हि आवश्यक आहे. त्यामुळे असे उपक्रम राबवले जातात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.