सांगली :- भयमुक्त, नशामुक्त अभियान बनते आहे जनचळवळ अल्पसंख्यांक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पाठबळ
सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा केला निर्धार पाचव्या दिवसांअखेर तब्ब्ल चार हजार हून अधिक नागरिकांनी शस्त्र परवाना मागणी अर्ज भरून सांगली बद्दल व्यक्त केली चिंता रमजान मस्जिद 100 फुटी कॉर्नर,कोल्हापूर रोड यांनी सदृढ पिढी घडविण्याचा व्यक्त केला विश्वास सांगलीमध्ये सुरू असलेल्या भयमुक्त व नशामुक्त जनजागृती मोहिमेला आज सांगली स्टॅन्ड, छत्रपती शाहू महाराज चौक, शंभर फुटी रोड, कोल्हापूर रोड या परिसरातील नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेच्या पाचव्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवत सुरक्षा व समाजव्यवस्थेबाबत जागरूकतेचा निर्धार व्यक्त केला.
सांगली जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य गेल्या काही महिन्यांपासून बदलेले आहे. खून, मारामाऱ्या, घरफोड्या, महिलांवरील अत्याचार, नशेच्या गोळ्या, ड्रग्स, गांजा, जुगार अड्डे यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना आपण पाहतोय. वाढत्या गुन्हेगारी आणि नशाखोरीमुळे सामान्य जनतेमध्ये निश्चितच भीतीचे वातावरण आहे. "जर नागरिकांना सुरक्षित वातावरण, सुरक्षा देणे शक्य नसेल तर स्व:रक्षणासाठी शस्त्र परवाने द्या" अशी प्रतिकात्मक अनोखी परंतु रास्त मागणी घेऊन या गंभीर पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संस्था-संघटना यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या सोयी-सुविधांच्या अभावाविरोधात आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.या अभियानाच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमांतर्गत स्वयं-सुरक्षा, गुन्हेगारीविरोधी जागरूकता, महिलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, आणि युवकांना नशेपासून दूर ठेवण्याचे संदेश देण्यात येत आहेत. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत प्रत्यक्ष भेटीद्वारे आवश्यक सूचना, प्रशासन विरोधी तक्रारी आणि अभियानास सहकार्य व्यक्त केले आहे. ह्याच वाढत्या असुरक्षित वातावरणात नागरिकांचा हा स्वयंप्रेरित सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे.रमजान मस्जिद, शंभर फुटी रोडच्या माध्यमातून तरुणांची निर्व्यसनी, सदृढ पिढी घडविण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.या विधायक उपक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष मा. तानाजीराव सावंत, मा. कुलदीप देवकुळे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, भारत संचार निगम लिमिटेडचे समिती सदस्य मा. युसूफ उर्फ लालू मेस्त्री, मा. आशिष कोरी, शहर अध्यक्ष मा. सुरेश टेंगले, त्याचबरोबर,रमजान मस्जिदचे मा. हाजी रियाज शेख, मा. हाफिज अशरफअली जमादार, मा. जहांगीर शेख, मा. इब्राहिम पखाली, मा. प्रा.तोहीद मुजावर, मा. आसिफ काझी, मा. नजीर पटेल, मा. सादिक पखाली,मा. नासिर जमादार, मा. हाफिज गौस नदाफ, मा. सलीम मुजावर, मा. अबू भाई बिडीवाले, मा. अहमद अली शेख,मा. रोहित घुबडे, मा. अमित पाटील, मुन्ना भाई पटेकरी, मा. संग्राम पाटणकर, मा. सागर कोळेकर, मा. सिद्धांत बुकटे, मा.अमर औरादे, कुमार सावंत यासह असंख्य निमंत्रक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.