Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

२० वर्षात २४ बदल्या, कुठेच टीकत नाही; तुकाराम मुंढेंना बडतर्फ करण्याची भाजप आमदाराची मागणी, फडणवीसांनी दिलं उत्तर

२० वर्षात २४ बदल्या, कुठेच टीकत नाही; तुकाराम मुंढेंना बडतर्फ करण्याची भाजप आमदाराची मागणी, फडणवीसांनी दिलं उत्तर


आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना बडतर्फ करावे अशी मागणी नागपूर पूर्वमधून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत केली. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचा अधिकार नसताना नियमबाह्य काम केल्याचा आरोप आमदार खोपडे यांनी केला.

तसंच महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींना धमकी देणं हा विशेषाधिकाराचा भंग आहे आणि तुकाराम मुंढेंबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं सांगितलं.

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत सांगितलं की, तुकाराम मुंढे हे २०२० मध्ये नागपूर महापालिकेत आले होते. आतापर्यंत त्यांच्या २० वर्षात २४ बदल्या झाल्या आहेत. नागपुरात आल्यानंतर त्या ७ महिन्यात त्यांनी मनमानी कारभार केला. स्मार्ट सिटीचा अधिकार नसताना अधिकार वापरला, मान्यता नसताना ठराविक कंत्राटदारांना चेक दिले. त्यावेळी पुराव्यासहीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. स्मार्ट सिटीच्या दोन महिला अधिकाऱ्यांना सही न केल्यानं तुकाराम मुंढेंनी महिलांना शिवीगाळ केली. त्यांनीही तक्रार दिली. पण दुर्दैव असं की अनिल देशमुख यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोपही भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. 
विधानसभेत याबाबत बोलणार असल्याच्या चर्चा बाहेर जाताच मला धमकीचे फोन आले. मी विधानसभेत आलो असताना तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही फोनवर धमकी आली की तुकाराम मुंढेंच्या विरोधात बोलू नका, गंभीर परिणाम होईल म्हणाले. मी कालच विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्रांना माहिती दिली. पोलिसात तक्रार दिलीय. आमदाराला अशा प्रकारे धमकी देत असतील तर याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. २० वर्षात २४ बदल्या झाल्या. तो कुठेही टीकत नाही. त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, आम्हाला संरक्षण द्यावं अशी मागणी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

आमदार प्रवीण दटके यांनीही कृष्णा खोपडे यांची बाजू घेत सभागृहात मुंढे यांच्यावर कारवाईची मागणी केली. आमदार दटके म्हणाले की, कृष्णा खोपडे चार टर्मचे आमदार आहेत. एका तरुण मुलीला, महिलेचा छळ केला जातो. त्यामुळे चुकीच्या धमक्या येणार असतील तर कारवाई करावी. सदस्याला धमकी येणं ही गंभीर बाब आहे. प्रश्न उपस्थित करताना तो प्रश्न उचलू नये यासाठी धमकी देणं हा विशेषाधिकाराचं भंग आहे. तुकाराम मुंढे आणि कारभारासंदर्भात सगळी माहिती घेऊन सविस्तर निवेदन सभागृहात केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, लोकप्रतिनिधींना धमकी देणं योग्य नाही, पण त्यावेळी त्यांची चौकशी केली गेली आणि क्लीनचीट मिळाली. महिला आयोगानेही ज्या महिलांनी तक्रार केली त्यांना दंड केला. एक अधिकारी नियमानुसार काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला दोष न देता ज्यांनी धमकी दिली आणि त्यात सहभागी असेल तर त्यावर कारवाई व्हावी.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.